नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांचा मैदानावरील दबदबा सर्व क्रिकेट प्रेमींना माहित असला तरी दोन्ही खेळाडू आपल्या स्पष्टवक्तेपणाबद्दलही चर्चेत असतात. सेहवागने ट्विटरवरून सर्वांचे मन जिंकले असून शोएब अख्तर युट्युबमुळे चाहत्यांच्या मनात आहे.
सेहवागने शोएबवर निशाणा साधला असून शोएब अख्तर पैशांसाठी भारतीय संघाचे कौतुक करतो, असे म्हटले आहे. सेहवागनुसार शोएब आमचा चांगला मित्र झाला आहे कारण त्याला भारताकडून बिजनेस पाहिजे असल्याने तो भारतीय संघाचे कौतुक करतो. तुम्ही जर शोएब अख्तरची मुलाखत पाहिली असेल तर तुम्हाला दिसेल की तो भारतचे कौतुक करत आहे. जेव्हा तो खेळत होता तेव्हा तो असे म्हणत होता. तसेच तो अनेकदा आपल्या युटूबवरून पाकिस्तानी क्रिकेट संघाची तुलना भारतीय संघासोबत करताना दिसतो.
इतकेच नाही तर सेहवाग भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवरही भडकला होता. आता संघातील खेळाडूंचे धैर्य कमी झाले आहे का, अस प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर एमएस धोनी जेव्हा कर्णधार होता तेव्हा फलंदाजीच्या क्रमात खेळाडूंच्या स्थानाबाबत खूप स्पष्टता होती, असे सेहवाग म्हणाला. तसेच तो प्रतिभा ओळखणारा असून त्याने त्या खेळाडूंना ओळखले ज्यांनी भारतीय क्रिकेटला पुढे नेले.