नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकांकडून कुठल्याही प्रकारचं लोन घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर खूप महत्वाचा असतो. क्रेडिट स्कोअर जितका चांगला असेल तेवढी लोन मिळण्याची जास्त शक्यता असते. तसेच लोनची रक्कम मोठ्या प्रमाणात भेटू शकते. कोणतीही बँक अथवा नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी ग्राहकाला लोन देण्याआधी त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर तपासतात. ज्या व्यक्तीने लोनसाठी अर्ज केला आहे त्याला लोन देता येईल का आणि कर्जाची रक्कम किती असेल हे क्रेडिट स्कोअरवरुन ठरवले जाते.बँकांना क्रेडिट स्कोअर रून त्या व्यक्तीची पेमेंट हिस्ट्री समजते. आज आपण क्रेडिट कार्ड संबंधित काही गोष्टी जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हला कर्जासाठी अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.तसेच पुढच्यावेळी लोनसाठी अर्ज करताना सगळ्या गोष्टी माहिती असाव्यात.
क्रेडिट स्कोअर किती असावा ?
क्रेडिट स्कोअरमुळे तुमच्या मागील लोनची माहिती भेटते. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर लोन लगेच भेटते. जर तुम्ही वेळेवर ईएमआय भरला असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 अंकाच्या दरम्यान असतो.जर एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर त्यास कर्ज मिळताना काहीच अडचण येत नाही. क्रेडिट स्कोअरमध्ये मागील 24 महीन्यांची क्रेडिट हिस्ट्री दिलेली असते. क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. यासाठी वेळेवर बिले भरणे,वेळोवेळी क्रेडिट स्कोअरची माहिती घेणे.गरज असेल तरच को-ब्रँडेड कार्ड घ्या, वीजेपासून इंश्युरन्सपर्यंतची सर्व बिले वेळच्यावेळी भरा,गॅरन्टी देणार्या व्यक्तीचे अकाउंट मॉनिटर करा.
क्रेडिट स्कोअर कसा ठरवला जातो ?
वेळेवर कर्ज चुकवण्याबाबत क्रेडिट स्कोअरमध्ये 30 टक्के भाग असतो.सेक्युर्ड किंवा अन सेक्युर्ड लोनचा 25 टक्के भाग असतो.सेक्युर्ड लोन मध्ये कार लोन किंवा होम लोन इत्यादीचा समावेश असतो. तर, अनसेक्युर्ड लोनमध्ये पर्सनल लोनचा सहभाग असतो.क्रेडिट स्कोअरमध्ये क्रेडिट एक्सपोजर 25 टक्के असते. तर, कर्जाच्या वापरासाठी क्रेडिट स्कोअरमध्ये 20 टक्के भाग असतो.
सिबिल रिपोर्ट कसा पहाल
तुमचा क्रेडिट स्कोअर जाणून घेण्यासाठी www.cibil.com या वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरा. यासाठी तुम्हाला 550 रुपये शुल्क भरावे लागेल. यासाठी एक वेळ ऑथेंटिकेशनची प्रक्रिया होते. या ऑथेंटिकेशन नंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर भेटतो तो तुम्हाला ई-मेल द्वारे पाठवला जातो.
सिबिलमध्ये सुधारणा कशी करावी
क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्डच्या पूर्ण लिमिटचा वापर करू नका. क्रेडिट कार्डच्या लिमिटपेक्षा जास्त लोन घेऊ नका. कर्जासाठी जास्त अर्ज करू नका. होम लोन आणि ऑटो लोनला जास्त महत्व द्या. शक्यतो पर्सनल लोन घेणे टाळा. क्रेडिट कार्ड बंद होणार नाही याची काळजी घ्या. ज्वॉइंट अकाउंट खात्यांची पाहणी करा. सिबिल स्कोअरची वेळोवेळी अपडेट घेत जा.