यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन- महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एका भीषण अपघातात 7 लोकांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. छोटा टेम्पो एका पुलावरून खाली कोसळून हा अपघात झाला आहे. ही घटना काळंब-जोदमोहा रस्त्यावर सकाळी घडली.
पोलिसांनी सांगितले की, एक छोटा टेम्पो काळंब-जोदमोहा रस्त्याने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो एका पुलावरून खाली कोसळला. टेम्पोत मोठ्या प्रमाणात लोक बसले होते. टेम्पोतील प्रवाशांपैकी 7 जण ठार झाले असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना सकाळी घडली आहे.
पोलिसांनी सांगितले की, हे सर्वजण एका ओळखीतील व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी गेले होते. अंत्यसंस्कार आटोपून हे सर्वजण जोदमोहा गावाकडे परतत होते. यावेळी टेम्पो पुलावरून खाली कोसळला.