नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या आजारात श्वासासंबंधी समस्या जास्त होत आहेत. फुफ्फुसांना संसर्ग झाल्याने ऑक्सीजन कमी होऊन हा त्रास होत आहे. अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी काही व्यायाम केल्यास अनेक फायदा होतील. शिवाय फुफ्फुसं सुद्धा मजबूत होतील. परंतु अनेक लोकांना दिर्घ श्वास घेण्याची योग्य पद्धत माहिती नसते. मायउपचारमध्ये प्रसिद्ध एका रिपोर्टनुसार, जाणून घेवूयात श्वास घेण्याची योग्य पद्धत…
असा करा श्वासाचा सराव
* फुफ्फुसांपर्यंत दिर्घ श्वास भरण्यापूर्वी एखाद्या शांत आणि नैसर्गिक ठिकाणी मॅट टाकून झोपा. डोकं आणि गुडघ्यांवर उशी ठेवा. खुर्चीवर बसून सुद्धा हा सराव करू शकता. हे लक्षात ठेवा की, खुर्ची पाठ, खांदे आणि मानेला सपोर्ट देणारी असावी.
* डोळे बंद करा आणि जवळपासचे वातावरण जाणून घ्या. हवेचा आवाज, झाडे आणि पक्षांचे आवाज, हे ऐकत हळुहळु दिर्घ श्वास पोटापर्यंत भरा. श्वास जेवढा रोखता येईल रोखून ठेवा आणि नंतर हळुहळु सोडा.
* हा सराव करताना एक हात पोटावर आणि दुसरा हात छातीवर ठेवा. हे लक्षात ठेवा की, जेव्हा श्वास भराल तेव्हा असा विचार करा करा की हवेतील ऑक्सीजन फुफ्फुसांना मजबूत करत आहे. आणि जेव्हा श्वास सोडाल तेव्हा असे अनुभवा की, सर्व नकारात्मकता आणि आजार सोडलेल्या श्वासातून बाहेर जात आहे.
* श्वास घेणे आणि सोडण्याचा कालावधी एक समान असावा. श्वास घेताना मनात 5 पर्यंत आकडे मोजा आणि सोडताना सुद्धा हिच प्रक्रिया करा. अशावेळी श्वास घेणे आणि सोडण्याचा वेळ एक समान असेल.
* एक्सरसाइज करताना थोड ढीले आणि आरामदायक कपडे घाला. खुप सहजपणे श्वास घ्या आणि सोडा. यामध्ये जास्त ताकद लावू नका. हे अतिशय सहज प्रकारे 10 ते 20 मिनिटांपर्यंत करा.