नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना महामारीच्या काळाचा सर्वांच्याच जीवनावर वाईट परिणाम होत आहे. सतत काळजी घेणे. तसेच जास्त काळ घरात राहिल्याने अनेक लोकांना डिप्रेशनचा त्रास सुद्धा होऊ लागला आहे. अनेकांची सहनशीलता कमी होऊ लागली आहे. तर काहींचा संयम कमी होत आहे. काही घरांमध्ये वाद सुद्धा सुरू झाले आहेत. अशावेळी मानसिक शांतत राखणे, ताण कमी करणे आवश्यक आहे. तसेच सकारात्मक विचारांची गरज आहे. काही अशा औषधी वनस्पती आणि फुले आहेत जी घरात ठेवल्याने सकारात्मक उर्जा मिळेल आणि कोरोना काळात तुमचा स्ट्रेस दूर होईल.
तुळस
तुळस लावल्याने सुख आणि शांती कायम राहते. सकारात्मक ऊर्जा मिळते. तिची पाने आजारांवर उपयोगी आहेत. शिवाय स्ट्रेस दूर होतो.
गुलाब
देशी गुलाब लावा, त्याचा सुगंध मनमोहक असतो. हे फुल शांती, प्रेम आणि सकारात्मक वातावरणाचे प्रतिक आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा, स्ट्रेस दूर होतो.
मनी प्लांट
मनी प्लांट घरात लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याची जास्त निगा राखावी लागत नाही.
जास्मीन
जास्मीनच्या फुलांचा सुगंध मनमोहक असतो. अनेक देशात यास पवित्र आणि पूज्य मानले जाते. याच्या फुलांनी आत्मविश्वास, प्रेम, मित्रता वाढते. मन आनंदी राहते.
रोजमेरी
रोजमेरीचे रोप घरात लावल्याने पवित्रता जाणवते. यामुळे राग शांत होतो. डिप्रेशन दूर राहते. एकटेपणा जाणवत नाही. शांतता निर्माण होते.
लिली
लिली सुद्धा पवित्र मानली जाते. तिच्या फुलास आनंदाचे प्रतीक मानले जाते. हे घरात आनंद आणते, नकारात्मकता दूर होते. बेडरूममध्ये लावल्यास चांगली झोप येते.