एआयजीकडून जारी प्रेसनोटमध्ये सोमवारी सांगण्यात आले की, अँटीबॉडी प्रतिक्रियेच्या तपासणीसह कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनच्या मिश्रणाचे सुरक्षा प्रोफ़ाईल ठरवण्यासाठी अभ्यास करण्यात आला होता.
एआयजी हॉस्पिटल्सचे प्रमुख डॉ. नागेश्वर रेड्डी यांनी म्हटले की, अभ्यासातील सर्वात महत्वाचा शोध हा होता की, मिश्र लशींच्या गटात आढळणार्या स्पाईक-प्रोटीनला निष्क्रिय करणारी अँटीबॉडी समान लशींच्या गटाच्या तुलनेत खुप जास्त होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संशोधनात सहभागी संशोधकांपैकी एक, डॉ. रेड्डी यांनी म्हटले, स्पाईक-प्रोटीन निष्प्रभ करणारी अँटीबॉडी ती आहे जी व्हायरसला मारते आणि समस्त संसर्ग कमी करते. आम्हाला आढळले की, जेव्हा पहिला आणि दुसरा डोस वेगवेगळ्या लशींचा असतो, तेव्हा स्पाईक-प्रोटीन अँटीबॉडी प्रतिक्रिया एकाच लशीच्या दोन डोसच्या तुलनेत चारपट जास्त असते. (Covaxin-Covishield Vaccines)
त्यांनी म्हटले की, निष्कर्ष विशेष प्रकारे महत्वाचा आहे, जेव्हा तिसरा अतिरिक्त डोस देण्यावर विचार केला जात आहे, ज्याचा उद्देश मजबूत अँटीबॉडी प्रतिक्रिया प्राप्त करणे आणि व्हायरस मारण्यात मदत करणे आहे.
रेड्डी यांनी म्हटले की, मिश्र लस निश्चित प्रकारे या स्पाईक-प्रोटीनला निष्प्रभ करणार्या अँटीबॉडीला प्रोत्साहन देऊ शकते. तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या विरूद्ध सुद्धा लशीचा प्रभाव वाढवेल. संशोधनाचे निष्कर्ष सांगतात की, कोविड-19 लशीचे (कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन) मिश्रण उच्च अँटीबॉडी प्रतिक्रिया प्रदान करते आणि सोबतच सुरक्षित सुद्धा आहे.
Web Title :- Covaxin-Covishield Vaccines | mix match of covaxin covishield elicits 4 times antibody response says study
Ajit Pawar | ‘लस नाही तर प्रवेश नाही’, अजित पवारांचा पुण्यात मोठा निर्णय
Mera Ration App | रेशन दुकान बदलायचं आहे? मग, ‘मेरा रेशन’ ॲप करा डाऊनलोड; जाणून घ्या