पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत (PDCC Bank Election Results) मुळशी तालुक्यात (Mulshi Taluka) 45 पैकी 27 मते घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सुनील चांदेरे (Sunil Chandere) यांनी आत्माराम कलाटे (Atmaram Kalate) यांचा पराभव केला. चांदेरे यांच्या विजयामुळे मुळशीच्या सहकारातील गादीच्या सत्तापरिवर्तनला सुरुवात झाली आहे. प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणूकीत (PDCC Bank Election Results) चांदेरे यांना विजयी करुन कलाटे यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करायचा, असे खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आगोदरच सांगितले होते.
मुळशी तालुक्यात 46 विकास सोसायट्या आहेत. जिल्हा बँकेच्या संचालक (District Bank Director) पदावर आत्माराम कलाटे हे मागील 22 वर्षापासून होते. एक वर्ष बँकेचे उपाध्यक्षपदही त्यांनी उपभोगले. राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना बँकेवर काम करण्याची संधी मिळाली असून त्यांनी राजाभाऊ हगवणे (Rajabhau Hagwane) यांचा दोन वेळा पराभव केला होता. (PDCC Bank Election Results)
राष्ट्रवादी सोडल्याने कलाटेंचा करेक्ट कार्यक्रम
राज्यात अडीच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कलाटे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला होता. भोर विधानसभेतून शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्याठिकाणी शिवसेनेने डावलल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.
दुसरीकडे सुनील चांदेरे हे विद्यार्थी दशेपासून शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे यांच्या विचारांना माननारे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. आपल्या तडफदार वकृत्वशैलीमुळे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असताना पंचायत समितीवर (Panchayat Samiti) राष्ट्रवादीची सत्ता आणण्यात त्यांची मोलाची कामगिरी ठरली. त्यांच्याकडे आतापर्यंत लोकनियुक्त कोणतेही पद नव्हते. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्यांनी मागील दोन वर्षापासून विकास सोसायटीच्या प्रतिनिधी निवडीपासून प्रयत्न करत होते. तसेच तालुका अध्यक्ष महादेव कोंढारे (Mahadev Kondhare) यांनी देखील सुनील चांदेरे यांच्या विजयाबाबत आत्मविश्वास दाखवला होता.
साम दाम दंड भेद नीतीचा वापर
एकीकडे अजित पवार यांचा सुनील चांदेरे यांना पाठिंबा तर दुसरीकडे 22 वर्षाचा आत्माराम कलाटे यांचा प्रदीर्घ अनुभव. यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान राष्ट्रवादीमधील काही मंडळी मात्र पडद्याआडून कलाटे यांना मदत करत होती.
या निवडणूकीत मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी साम दाम दंड भेद या नितीचाही वापर केला गेला. गुन्हेगारीची दहशतही दाखवली गेली. मतदारांना पैशांचे वाटप करण्यात आले. मात्र, 45 पैकी 27 मते घेऊन चांदेरे विजयी झाले. या निवडणुकीत जामगावला वेळीच प्रतिनिधी न मिळाल्याने ही सोसायटी निवडणुकीपासून वंचित राहिली.
Web Title : PDCC Bank Election Results | pdcc bank sunil chandere wins pune district bank election from mulshi while atmaram kalate lose pdcc bank election mulshi taluka
SBI ग्राहकांसाठी ‘गुड न्यूज’, बँकेने उचलले हे मोठे पाऊल