बहुजननामा : इंग्लंडमधील राहणाऱ्या एका जोडप्याला सुट्ट्या चांगल्याच महागात पडलया आहे. सुट्टीवर गेले असता या जोडप्याच्या बाळाने वेळेच्या तीन महिन्यांपूर्वी जन्म घेतल्यामूळे त्यांच्या अडचणीत अजूनच भर पडली आहे. त्यांना रुग्णालय आणि हॉटेलवरील खर्चासाठी २. ६ कोटी रुपयांचे बिल द्यावे लागणार आहे. हे जोडपे सुट्टीसाठी अमेरिकेत गेले होती.
इंग्लंडच्या लिन्कोल्नशायर रहिवासी असलेले लुईस बोरिल आणि त्याची मंगेतर, येरडियाना चाझारेस हे प्रेमी युगुल अमेरिकेत सुट्टीवर होते. एके दिवशी येरिडियानाची तब्येत अचानक खराब झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिने मुलीला जन्म दिला.
बाळाचा जन्म हा नोव्हेंबरमध्ये होईल अशी अपेक्षा होती, परंतु ६ ऑगस्ट रोजी यरीडिआनाने एका मुलीला जन्म दिला. त्यामुळे मुलीला आता पुढील ३ महिने हॉस्पिटलमध्ये रहावे लागणार आहे आणि या काळात ते आपल्या देशात परत देखील जाऊ शकणार नाही.
या काळ रुग्णालय आणि हॉटेलमध्ये राहण्यासाठी सुमारे २. ६ कोटी रुपये खर्च येऊ शकतो. लुई म्हणाले की, डॉक्टरांनी बाळाच्या अचानक प्रसूतीबद्दल सांगितले तेव्हा त्यांना धक्का बसला. जोडप्यास विमा नसल्याने त्यांना रुग्णालयाला भरमसाठ किंमत मोजावी लागली. जोडप्याने मदतीसाठी मोहीम देखील सुरू केली आहे. त्यांना आतापर्यंत २ लाख रुपये मिळाले आहेत. एवढी मोठी रक्कम गोळा करणे अवघड आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी