बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस(Coronavirus) संक्रमितांचा आकडा 73 लाखांच्या पुढे गेला आहे. कोरोनामुळे(Coronavirus) आतापर्यंत 73 लाख 7 हजार 98 लोक संक्रमित झाले आहेत. मागील 24 तासात कोरोनाच्या 67 हजार 708 नवे रूग्ण सापडले. बुधवारी 680 लोकांचा मृत्यू झाला आणि 76 हजार रूग्ण रिकव्हर झाले. संसर्गामुळे 1 लाख 11 हजार 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, दिलासादायक गोष्ट ही आहे की, आतापर्यंत 63 लाख 83 हजार 442 लोक बरे झाले आहेत. तर, 8 लाख 12 हजार 390 रूग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत म्हणजे या अॅक्टिव्ह केस आहेत.
कोरोनामुळे 26 ते 60 वर्षाच्या 45% रूग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, संसर्गाने कमी वयाच्या रूग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाणसुद्धा वेगाने वाढू लागले आहेत. आतापर्यंत जीव गमावणारे 45% रूग्ण असे होते, ज्यांचे वय 26 ते 60 वर्षांच्या दरम्यान होते. यासाठी मंत्रालयाने तरूणांना सावध केले आहे. मंत्रालयाने म्हटले की, जर तुम्ही हा विचार करत असाल की कोरोना केवळ ज्येष्ठांचा जीव घेत आहे तर ते चुकीचे आहे. आकड्यांनुसार, कोरोनामुळे जीव गमावणार्यांमध्ये सर्वात जास्त 70% रूग्ण पुरूष होते, तर 30% रूग्ण महिला होत्या. यामध्ये 53% मृत रूग्णांचे वय 60 वर्षांपेक्षा जस्त होते.
महाराष्ट्रात 10 हजार 552 नवे रूग्ण
महाराष्ट्रात बुधवारी 10 हजार 552 नवे रूग्ण सापडले, 19 हजार 517 लोक बरे झाले आहेत आणि 158 रूग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 15 लाख 54 हजार 389 लोक संक्रमित आढळले आहेत. यामध्ये 1 लाख 96 हजार 288 रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर, 13 लाख 16 हजार 769 लोक बरे झाले आहेत. संसर्गामुळे आतापर्यंत 40 हजार 859 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.