नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॉस्पिटलमधील उपचारानंतर बरे झालेल्या कोरोना रूग्णांमध्ये अनेक आठवड्यानंतर सुद्धा काही लक्षणे दिसून येत आहेत. जामा जर्नलमध्ये प्रकाशित स्टडीमध्ये संशोधकांनी याबाबत माहिती दिली आहे. इटलीच्या संशोधकांना आढळले आहे की, कोरोना आजार बरा झाल्यानंतर दोन महिन्यानंतर सुद्धा थकव्यासारखी लक्षणे लोकांमध्ये कायम आहेत.
इटलीत 143 लोकांवर अभ्यास करण्यात आला, जे कोरोनाने संक्रमित झाले होते आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागेल होते. स्टडीमध्ये समजले की, 90 टक्के लोकांमध्ये आजार सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांतर सुद्धा काही लक्षणे कायम होती. यामध्ये थकवा, श्वास घेण्यास त्रास, सांधेदुखी, आदीचा समावेश होता. रोमच्या एका हॉस्पिटलचे डॉक्टर एंजेलो कार्फी यांनी या स्टडीचे नेतृत्व केले.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, रिसर्चमध्य समजले की, आजार झाल्यानंतर सुमारे 60 दिवसांनंतर केवळ 12.6 टक्के लोकच कोरोनाच्या लक्षणातून पूर्णपणे मुक्त झाले. स्टडीच्या दरम्यान अर्ध्या लोकांनी सांगितले की, त्यांची लाइफ कॉलिटी पहिल्याच्या तुलनते खराब झाली आहे. एक्सपर्टने स्टडीचे निष्कर्ष खुपच चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी एका स्टडीमध्ये समोर आले होते की, कोरोनामुळे ज्या रूग्णांची चव आणि वास घेण्याची शक्ती जाते, त्यापैकी 10 टक्के रूग्णांमध्ये हे लक्षण एक महिन्यानंतरही नष्ट होत नाही. प्रत्यक्षात कोरोना हा नवा आजार असल्याने अजूनपर्यंत डॉक्टरांनाही व्यवस्थित समजलेले नाही की, दिर्घकालावधीत कोरोना रूग्णांवर कोणकोणते परिणाम करतो.
तर, इटलीच्या स्टडीमध्ये हे सुद्धा समजले की, कोरोनातून बरे झालेल्या सुमारे 55 टक्के लोकांमध्ये दोन महिन्यानंतर सुद्धा तीन किंवा तीनपेक्षा जास्त लक्षणे कायम होती. तर 32 टक्के रूग्णांमध्ये एक किंवा दोन लक्षणे होती. तर, 43 टक्के रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि 21 टक्के लोकांच्या छातीत वेदना होत होत्या. परंतु, हे सर्व रूग्ण कोरोना निगेटिव्ह घोषित झालेले होते.