बहुजननामा ऑनलाइन टीम – देशभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरूच आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 51 लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसमुळं एका दिवसाला मरणाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. भारतात एकूण मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या 324 झाली आहे. असं असलं तरी लोक एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत. बॉलिवूड स्टार शाहरुख खाननं पुन्हा एकदा मदतीचा हात पुढं केला आहे. त्यानं महाराष्ट्र सरकारला 25000 पर्सनल प्रोटेक्टीव यनिट (PPE) दिले आहेत.
Thank you sir for all your help to source the kits. We are all together in this endeavour to protect ourselves and humanity. Glad to be of service. May your family & team be safe and healthy. https://t.co/DPAc7ROh7i
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 13, 2020
मंत्र्यांनी मानले शाहरुखचे आभार
शाहरुख खाननं केलेली मदत पाहून महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शाहरुख खानचं आभार मानलं आहेत. ट्विट करत त्यांनी लिहिलं की, शाहरुखचा हा प्रयत्न कॉविड 19 विरुद्धच्या या लढाईत त्यांना मदत करेल आणि डॉक्टरांचं संक्षरण करणंही त्यांना आता सोपं होईल.
याआधीही केली मदत
शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी त्यांची 4 मजली इमारत बीएमसीला सोपवली होती. शाहरुखनं ही इमारत क्वारंटाईन सेंटर बनवण्यासाठी देऊ केली होती जिथं लहान मुल, महिला किंवा वृद्धांना क्वारंटाईनमध्ये ठेवलं जाणार होतं. यावेळीही बीएमसीनं त्याचे आभार मानले होते.
शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.