मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही आता 19 लाखांच्या जवळ पोहचली आहे. शनिवारी (दि.19) राज्यात 3 हजार 940 रुग्णांची भर पडली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ही 18 लाख 92 हजार 707 वर वर गेली आहे.
Maharashtra reported 3,940 new #COVID19 cases, 3,119 discharges, and 74 deaths today, as per State Health Department
Total cases: 18,92,707
Total recoveries: 17,81,841
Death toll: 48,648
Total active cases: 61,095 pic.twitter.com/anWUQs2vla
— ANI (@ANI) December 19, 2020
दिवसभरात 3 हजार 119 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत 17 लाख 81 हजार 841 एवढी झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या सध्या आटोक्यात असल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.14 टक्के इतके आहे. शनिवारी 75 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.57 वर पोहोचले आहे.
राज्यात आजपर्यंत 1 कोटी 20 लाख 59 हजार 235 प्रयोगशाळा चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी 18 लाख 92 हजार 707 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे प्रमाण 15.7 टक्के इतके आहे. राज्यात 5 लाख 360 लोक होम क्वारंटाईन असून 4 हजार 20 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात 61 हजार 95 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.