मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वर्षा राऊत यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वर्षा राऊत यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप, सर्दी आणि खोकला होता. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या कुटुंबीयातील प्रमुख सदस्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे संजय राऊत यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे.
संजय राऊत यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे अद्याप दिसत नाहीत. परंतू राऊत यांनी कालच ब्रिच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे अनेकांकडून काळजी व्यक्त केली जात आहे.