बहुजननामा ऑनलाइन – कोरोनावर लस (icmr )शोधून त्याला आळा घालण्यासाठी सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. अशातच भारतातील औषध महानियंत्रकनं कोरोना व्हायरस महामारीवरील संभाव्य उपचार अँटीसेरा च्या मानवी परीक्षणासाठी इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चला (icmr ) मंजुरी दिली आहे. ICMR च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटीसेरा घोड्यांना निष्क्रिय Sars-Cov-2 (व्हायरस) चं इजक्शन देऊन विकसित करण्यात आलं आहे.
आयसीएमआरचे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, “आयसीएमआरनं हैदराबाद येथील फार्मास्युटीकल कंपनी बायोलॉजिकल ई. लिमिटेडच्या सथीनं अँटीसेरा विकसित केली आहे. आम्हाला नुकतीच त्याच्या क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळाली आहे.”
यापूर्वी ICMR नं आपल्या एका निवेदनात म्हटलं होतं की, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांपासून मिळालेला प्लाझ्मा देखील हा उद्देश पूर्ण करू शकतो. मात्र अँटीबॉडीजची प्रोफाईल आणि त्याचा प्रभाव एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णात भिन्न आहे. त्यामुळं हे कोरोना रुग्णांच्या व्यवस्थापनात अविश्वसनीय ठरतं.
अँटीसेरा म्हणजे काय ?
अँटीसेरा म्हणजे एक प्रकारचे ब्लड सीरम आहे. यात एका विशिष्ट प्रकारच्या रोगजंतूंसोबत लढण्याची क्षमता असलेल्या अँटीबॉडीजचे प्रमाण जास्त असते. कुठल्याही विशिष्ठ प्रकारच्या संक्रमणाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली रोगप्रतिकारक शक्ती वेगानं वाढवण्यासाठी हे इंजक्शनच्या मदतीनं माणसांना दिलं जातं.
‘या’ आजारांसाठीही करण्यात आलाय वापर
यापूर्वी हॉर्स सेराचा वापर अनेक प्रकारचे व्हायरल आणि बॅक्टेरियल इंफेक्शन्स, रेबीज हॅपेटायटीस बी, वॅक्सिनिया व्हायरस, टेटनस, बोटूलिझम आणि डायरियाच्या उपचारांसाठी करण्यात आला आहे.