बहुजननामा ऑनलाइन टीम –
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे वाढून आता 33 लाख 87 हजार 501 झाली आहेत. लागोपाठ दुसर्या दिवशी 75 हजारपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह केस आल्या. गुरुवारी कोविड-19 संसर्गाची विक्रमी 77,266 नवी प्रकरणे आली. 24 तासात 1,057 संक्रमितांचा मृत्यू सुद्धा झाला. जगातील देशांबाबत बोलायचे तर भारतात रोज सर्वात जास्त कोरोना रूग्ण सापडत आहेत.
भारतात गुरुवारी नोंदल्या गेलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रकरणांनी जगभरात एका दिवसात समोर आलेल्या प्रकरणांचा विक्रम मोडला आहे. अजूनपर्यंत कोणत्याही देशात 24 तासात कोरोना संसर्गाच्या इतक्या केसची नोंद झालेली नाही. यापूर्वी अमेरिकेत कमाल 77255 केस नोंदल्या गेल्या होत्या, तर भारतात आज 77,266 केस नोंदल्या गेल्या. सर्वात जास्त संक्रमितांच्या बाबतीत आपण तिसर्या क्रमांकावर आहोत. तसेच कोरोनामुळे सर्वात जास्त मृत्यूंच्या बाबतीत आपण चौथ्या नंबरवर आहोत. भारत दुसरा असा देश आहे, जेथे सर्वात जास्त अॅक्टिव्ह केस आहेत.
India's #COVID19 case tally at 33.87 lakh with a record spike of 77,266 fresh cases, & 1,057 deaths in the last 24 hours.
COVID-19 case tally in the country stands at 33,87,501 including 7,42,023 active cases, 25,83,948 cured/discharged/migrated & 61,529 deaths: Health Ministry pic.twitter.com/uANJwfrbey
— ANI (@ANI) August 28, 2020
आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आता कोरोनाच्या 7 लाख 42 हजार 23 अॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 61 हजार 529 लोकांचा जीव गेला आहे. 24 तासात 9 लाखांपेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्या. आतापर्यंत एकुण 3.9 कोटी लोकांची टेस्ट करण्यात आली आहे. देशात रिकव्हरी रेट सध्या 76.24% झाला आहे.
7 ऑगस्टला देशात पहिल्यांदा कोरोनाची 60,000 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली. तेव्हापासून हा ग्राफ लागोपाठ वाढत आहे. गुरुवारी प्रथमच 75,760 नवे कोरोना रूग्ण सापडले. मागील 24 तासात केवळ डेली केसमध्ये नव्हे तर एकुण प्रकरणात सुद्धा एक महिन्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी उडी आहे. अमेरिकेत मागील 24 तासात 43,000 आणि ब्राझीलमध्ये 47,000पेक्षा जास्त नव्या केस आल्या आहेत.
या राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह केस
देशात सर्वात जास्त अॅक्टिव्ह केस महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात दिड लाखांपेक्षा जास्त संक्रमितांवर उपचार सुरू आहेत. दुसरा नंबर तमिळनाडु, तिसरा नंबर दिल्ली, चौथा नंबर गुजरात आणि पाचव्यानंबरवर पश्चिम बंगाल आहे. या पाच राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह केस आहेत.
23 तासात कोणत्या राज्यात किती मृत्यू
24 तासात महाराष्ट्रात सर्वात जास्त 355 मृत्यू झाले. तमिळनाडुत 109, कर्नाटकात 141 आणि आंध्र प्रदेशात 92, उत्तर प्रदेश 76, पश्चिम बंगाल 53, पंजाब 37, जम्मू काश्मीर 14, दिल्ली 22, गुजरात 17 आणि मध्य प्रदेश 24, तेलंगना 8, बिहार 9, ओडिसा 7 आणि केरळ 10, राजस्थान 13 आणि हरियाणामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात 14,718 नवी प्रकरणे
महाराष्ट्रात गुरूवारी कोरोना व्हायरसची 14,718 नवी प्रकरणे समोर आली आणि यासोबतच एकुण संक्रमितांची संख्या वाढून 7,33,568 झाली. याशिवाय 355 रूग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकुण संख्या 23,444 पर्यंत पोहचली आहे. राज्यात आता 1,78,234 रूग्णांवर उपचार सुरू आहे. गुरूवारी 9,136 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 5,31,563 संक्रमित रूग्ण बरे झाले आहेत.