पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात मागील चोवीस तासांत १ हजार २३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून नवीन ५५९ रुग्णांची भर पडली आहे. तर शहरातील २७ रुग्णांसह ३८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अॅक्टीव्ह कोरोना बाधितांची संख्या ७ हजार ४४ पर्यंत कमी झाली आहे. १ हजार ६४७ रुग्ण ऑक्सीजनवर असून यापैकी ९६३ अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. आतापर्यंत ४ लाख ६९ हजार २६१ पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली असली तरी त्यापैकी ४ लाख ५४ हजार १३ जण बरेही झाले आहेत. दुर्देवाने ८ हजार २०४ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात मागील चोवीस तासांत ७ हजार ९६६ संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.