पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1925 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून दिवसभरात शहरातील 7 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील दोघांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाणे वाढत आहे.
सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही 2 लाख 21 हजार 210 वर पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 2 लाख 3 हजार 16 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 13 हजार 225 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. त्यापैकी 394 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळं 4 हजार 969 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 8 हजार 44 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 350 जणांचा कोरोनाचा अहवाल हा सकारात्मक आला आहे. आज दिवसभरात 677 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.