पिंपरी न्यूज (Pimpri News) : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोना बाधित रुग्णांच्या (Corona-infected patient) संख्येत घट झाली आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा (New patient) बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या अधिक होती. त्यामुळे शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या (Active patient) संख्येत घट झाली होती. शहरात लागू केलेले निर्बंध (Restrictions) शिथील केल्यापासून शहरामध्ये नवीन रुग्णांच्या (New patient) संख्येत वाढ होत आहे. आज शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची (New patient) संख्या अधिक असून अॅक्टिव्ह रुग्णांची (Active patient) संख्या देखील वाढली आहे. शहरात गेल्या 24 तासात 282 नवीन कोरोना बाधित रुग्णांची (new corona infected patient) नोंद झाली आहे. तर 49 रुग्णांना आज डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. Coronavirus in Pimpri | pimpri chinchwad coronavirus news updates
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department of Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 282 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 57 हजार 788 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 49 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 52 हजार 134 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 1 हजार 368 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार (Treatment) सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 05 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 03 रुग्ण शहरातील आहेत.
तर 02 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4286 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी (दि.30) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वतीने करण्यात येणारे लसीकरण (Vaccination) बंद होते.
तर शहरातील 21 खासगी लसीकरण केंद्रावर (Private Vaccination Center) लसीकरण (Vaccination) करण्यात आले.
आज दिवसभरात 5 हजार 807 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 6 लाख 51 हजार 810 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : Coronavirus in Pimpri | pimpri chinchwad coronavirus news updates
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Kisan Credit Card साठी अर्ज करण्याची मुदत आली जवळ, जाणून घ्या कशी आहे पद्धत