बुलडाणा : बहुजननामा ऑनलाईन – एका पोलीसाने मद्यधुंद अवस्थेत (Drunk policeman) कोविड सेंटरमध्ये (covid centre) धिंगाणा घातल्याचा विचित्र आणि संतापजनक प्रकार बुलडाण्यातून (Buldhana) समोर आला आहे. शहरातील अपंग निवासी विद्यालय कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बुलडाणा पोलिसांची प्रतिमा देखील या घटनेमुळे मलीन झाली आहे. त्यामुळे कायद्याचे तीनतेरा वाजवणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात? याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. drunk policeman misbehave at covid centre in buldhana
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने एका आरोपीला तपासणीसाठी कोविड सेंटरमध्ये आणले होते. यावेळी दारुच्या नशेत असलेल्या पोलिसांने थेट कोविड सेंटरमध्येच धिंगाणा घातला. यावेळी सेंटरमधील महिला कर्मचाऱ्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण नशेत असलेल्या या पोलिसाने उलट त्यांनाच दमदाटी केली. त्याचे हे सगळ कृत्य तिथल्या कर्मचाऱ्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले आहे. त्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे पोलिसासोबत एक आरोपीदेखील होता. त्याने आरोपी समोरच हा नंगानाच केला.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत पोलिसाचा धिंगाणा स्पष्टपणे दिसत आहे. पोलीस कर्मचारी कोविड सेंटरमध्ये जमिनीवर झोपला आहे. तिथला एक कर्मचारी तुम्ही दारू पिवून का आलात? असा प्रश्न विचारतो. त्यावर पोलिसांने तू कोण बोलणारा मला? असा उलट प्रश्न विचारत आहे. तसेच तुमचा इथला इन्चार्ज कोण? असाही प्रश्न पोलीस कर्मचारी विचारताना दिसत आहे.
Web Titel : drunk policeman misbehave at covid centre in buldhana
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Kisan Credit Card साठी अर्ज करण्याची मुदत आली जवळ, जाणून घ्या कशी आहे पद्धत