मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात एकीकडे नवीन वर्षाच्या (New Year) स्वागतासाठी पार्ट्यांचे आयोजन केलं जात आहे, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधित (Coronavirus in Mumbai) रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज मुंबईत पुन्हा कोरोनाबाधित (Coronavirus in Mumbai) रुग्णांची संख्या ही 3 हजाराच्या पुढे गेली आहे.
मुंबई महापालिकेच्या (BMC) शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus in Mumbai) माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीनुसार, गेल्या 24 तासात मुंबईमध्ये तब्बल 3671 नवे रुग्ण आढळले आहेत. मागील तीन दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे. तर 371 रुग्ण आज बरे झाले आहेत.
दोन दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित आणि ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी देखील मुंबईत एकाच दिवशी धक्कादायक आकडेवारी समोर आली होती. एकाच दिवसा 2172 रुग्ण आढळले होते. 2172 पैकी 1377 रुग्ण एकट्या मुंबईत होते. तर बुधवारी एकाच दिवसात कोरोनाचे 2510 नवे रुग्ण आढळून आले होते.
मागील तीन ते चार दिवसांतील आकडेवारीवरुन महाराष्ट्रात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी मुंबईतील प्रमाण सतत 55 टक्क्यांच्यार नोंदवण्यात आले आहे. मुंबईचा रुग्ण दुप्पट होण्याचा रेट 505 दिवस इतका आहे. सध्या मुंबईत 11 हजार 360 अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहेत. मुंबईसाठी ही चिंताजनक बाब असून नागरिकांची कळजी यामुळे वाढली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुंबईत नवी नियमावली जाहीर
- नववर्ष स्वागताचे कार्यक्रम/ समारंभ/ पार्टी आयोजित न करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. हॉटेल्स, उपहारगृह, यांच्यासह विविध आस्थापनांना उपस्थितीच्या मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन होते की नाही यावर देखरेख करण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करावी.
- सूचनांचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या हॉटेल्स, उपहारगृहांवर सक्त कारवाई करावी.
- सर्व सहायक आयुक्त यांनी आपापल्या अख्यारितील हॉटेल्स, उपहारगृह यांचे दैनंदिन फुटेज तपासून उपस्थिती नियम पाळले जात असल्याची खातरजमा करावी.
- विमानतळावर (Airport) रॅपिड टेस्ट मध्ये (Rapid Test) बाधित आढळलेल्या रुग्णांची नियमित आरटीपीसीआर चाचणी करावी. जर चाचणी पॉझिटिव्ह आली तर रुग्णाला विलगीकरण किंवा रुग्णालयात दाखल करावे.
Web Title : Coronavirus in Mumbai | in the last 24 hours 3671 new coroan patients were found in mumbai bombay towards lockdown?
Multibagger Penny stock | 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 68 लाख, टाटा ग्रुपची आहे कंपनी