मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या वाढत आहे. आज राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41 हजारांच्यावर गेल्याने चिंता वाढली आहे. त्यातच ओमिक्रॉनचे (Omycron Variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. आज दिवसभरात राज्यात 41 हजार 434 नवीन कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या दीड लाखांच्या वर गेली आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रविवारी (दि.9) मध्यरात्रीपासून राज्यात नवीन नियम लागू केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात गेल्या 24 तासात 9,671 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 65 लाख 57 हजार 081 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.37 टक्के झाले आहे. राज्यात आज 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 627 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.05 टक्के झाला आहे.
41,434 new COVID cases, 9,671 recoveries, and 13 deaths in Maharashtra in the last 24 hours
Active cases: 1,73,238
Death toll: 1,41,627Number of #Omicron cases rises to 1009 in the state pic.twitter.com/8aJCErmott
— ANI (@ANI) January 8, 2022
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 03 लाख 42 हजार 173 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 68 लाख 75 हजार 656 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.77 टक्के आहे. सध्या 1 लाख 73 हजार 228 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 8 लाख 45 हजार 089 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 1851 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
Web Title : Coronavirus in Maharashtra | The number of ‘corona’ patients has increased in the state! Over 41,000 new patients in the last 24 hours, find out other statistics
PM Narendra Modi | पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील चुका काय होत्या?, धक्कादायक माहिती समोर