मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Coronavirus in Maharashtra |महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत आहे. कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) रोजचा आकडा काही दिवसांपासून 5 हजारांच्या खाली आला आहे. आज 5,132 नवीन कोरोना बाधित रुग्णांची (new patient) नोंद झाली आहे. तर आज 8,196 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज (discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची (Recover patient) संख्या आता 62 लाख 09 हजार 364 इतकी झाली आहे. आज 158 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात सध्या 58 हजार 069 रुग्ण अॅक्टिव्ह (active) आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रामाण (Recovery Rate) 96.93 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज 158 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 14 लाख 89 हजार 080 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी (Laboratory sample) 64 लाख 06 हजार 345 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 46 हजार 290 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home quarantine) आहेत. तर 2 हजार 371 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.
Maharashtra records 5,132 fresh #COVID19 cases, 8,196 recoveries and 158 deaths in the last 24 hours.
Active cases: 58,069
Total cases: 64,06,345
Death Toll: 1,35,413 pic.twitter.com/cJbpgDIRfh— ANI (@ANI) August 18, 2021
पुण्यातील (Pune) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 266 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 215 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 13 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 05.
– 202 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 491008.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2056.
– एकूण मृत्यू – 8863.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 480089.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9604.
पिंपरी चिंचवडमधील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 172 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 189 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात कोरोनाबाधित 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 267576.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1086.
– एकूण मृत्यू – 4382.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 262238.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 5606.
Web Title : Coronavirus in Maharashtra | Comfortable In the last 24 hours 5132 new patients of Corona discharged 8196 patients in the state
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Credit Card Market | एचडीएफसी बँकेवरील बॅनमुळे ICICI बँकेचा झाला फायदा, 13.63 टक्के राहिली ग्रोथ