मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (शुक्रवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या मात्र आज वाढली आहे. एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसत असताना दुसरीकडे मृत्यूंचा (Death) आकडा वाढताना दिसत असल्याने राज्यासाठी (Coronavirus in Maharashtra) ही चिंताजनक स्थिती आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
https://twitter.com/PIBMumbai/status/1421118044621852676?s=20
राज्यात आज 6,600 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7, 431 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 60 लाख 83 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 96.61 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 231 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.1 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यात 77 हजार 494 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत 1 लाख 32 हजार 566 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 77 लाख 60 हजार 862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 96 हजार 756 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
महाराष्ट्रत सध्या 4 लाख 79 हजार 553 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 3,289 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | 7,431 corona free in the last 24 hours in the state find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
CM Uddhav Thackeray | ‘आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर संकट पाठ सोडणार नाही’