मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील कोरोना संसर्गाची (Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट काही प्रमाणात ओसरली आहे. मात्र राज्यात अजुनही दररोज दोन हजारांच्या आसपास नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) आढळून येत असून, कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे (Recover Patient) होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 781 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 हजार 701 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे.
https://twitter.com/PIBMumbai/status/1451927310332936196?s=20
राज्यात गेल्या 24 तासात 33 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 998 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 33 हजार 919 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.46 टक्के एवढे झाले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
सध्या राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 17 लाख 62 हजार 963 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 01 हजार 551 नमुने पॉझिटिव्ह (positive patients) आले आहेत.
सध्या राज्यात 1 लाख 95 हजार 603 व्यक्ती गृह विलगिकरणात (home quarantine) आहेत.
तर, 926 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात (institutional quarantine) आहेत.
राज्यात आज रोजी एकूण 24 हजार 022 अॅक्टिव्ह रूग्ण (Active Cases) आहेत.
Web Title : Coronavirus in Maharashtra | 1,781 ‘corona’ free in last 24 hours in the state, find out other statistics
Pune Crime | संतोष जगतापची ‘गेम’ करणार्या दोघांच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या; इंदापूर परिसरातून अग्नीशस्त्रे अन् वाहनासह अटक
PM Garib Kalyan Yojana | पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये सरकारने दिली आणखी एक मोठी सुविधा; हजारो लोकांना होणार लाभ
Social Media | सोशल मीडियावर शेयर केले पतीसोबत झालेले चॅट, न्यायालयाने पत्नीला सुनावली शिक्षा