पुणे : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे खूप हुशार नेते आहेत. त्यांच्यावर माझा अभ्यास सुरू असून लवकरच त्यांच्यावर मी पीएचडी करणार आहे, असे राजकीय वक्तव्य काही महिन्यांपूर्वी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होते. चंद्रकांत पाटील यांचे (Chandrakant Patil) पीएचडीचे हे वक्तव्य राजकीय शेरेबाजी असली तरी प्रत्यक्ष पीएचडी (PhD) करण्याच्या बाबतीत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना कोथरूडच्या भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former BJP MLA Medha Kulkarni) यांनी मागे टाकले आहे. कारण कुलकणी यांनी खरोखरची पीएचडी मिळवली आहे.
भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि भाजपाच्या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (Savitribai Phule Pune University) ‘शाळा सिद्धी समृद्ध शाळा’ या विषयात पीएचडी (PhD) केली आहे. त्यांनी शासनाच्या शाळा मुल्यमापन उपक्रमावर हे संशोधन केले आहे. यासाठी त्यांना डॉ. ललिता वर्तक यांनी मार्गदर्शन केले. स्वता ट्विट करत कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे.
राजकारण-समाजकारणासारख्या व्यस्ततेच्या क्षेत्रात कार्यरत असतानाही आपण पीएचडी प्राप्त केली,हे निश्चितच गौरवास्पद आहे.@Medha_kulkarniताई आपले मनापासून अभिनंदन!
शाळा सिद्धी-समृद्ध शाळा या शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेवर आधारित आपला हा अभ्यास शिक्षण क्षेत्राला निश्चितपणे लाभदायी ठरेल. https://t.co/4oTSWk0y2S— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 23, 2021
दरम्यान, मेधा कुलकणी यांनी मिळवलेल्या यशाबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कुलकर्णी यांचे अभिनंदन केले आहे. राजकारण समाजकारणासारख्या व्यस्ततेच्या क्षेत्रात कार्यरत असताना पीएचडी प्राप्त केली हे गैरवास्पद आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
मेधा कुलकर्णी 2014 मध्ये कोथरूड विधानसभा मतदरसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या होत्या. परंतु 2019 ला विधानसभेच्या निवडणूकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून तिकिट मिळाल्याने त्यांचे तिकिट कापले गेले. यानंतर मेधा कुलकर्णी फारशा चर्चेत नव्हत्या. यानंतर त्यांच्यावर महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
Web Title : Chandrakant Patil | Before BJP state president Chandrakant Patil, former MLA Medha Kulkarni done Phd, find out
Social Media | सोशल मीडियावर शेयर केले पतीसोबत झालेले चॅट, न्यायालयाने पत्नीला सुनावली शिक्षा