बहुजननामा ऑनलाइन टीम – सणाच्या सीझनमध्ये दिल्लीवाल्यांसाठी चारही बाजूने अडचणी निर्माण झाल्या आहेत. घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. कोरोनाच्या (Coronavirus)वाढणार्या विक्रमी केस आणि वाढते प्रदूषण असे दुहेरी संकट आहे. मागील 24 तासात दिल्लीत कोरोनाची 6725 नवी प्रकरणे समोर आली आहेत आणि 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोना व्हायरस रूग्णांची एकुण संख्या 4 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 10 दिवसात दिल्लीत कोरोनाचे 50,000 पेक्षा जास्त रुग्ण समोर आले आहेत. आकड्यांनुसार 25 ऑक्टोबरपासनू 3 नोव्हेंबरदरम्यान, दिल्लीत 50,616 नवी प्रकरणे समोर आली आहेत, म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत एका दिवसात सरासरी आकडा 5,062 राहिला आहे. तर, या कालावधी दरम्यान 394 मृत्यू नोंदले गेले आहेत.
दिल्लीत मागील 24 तासात 3610 लोकांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तर या दरम्यान 59540 लोकांची टेस्टिंग करण्यात आल्या. दिल्लीत आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 6652 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत कोरोना डेथ रेट 1.65 टक्के आहे. दिल्लीत कोरोना संसर्ग दर 11.29 टक्के झाला आहे. येथे आता कोरोना व्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या 4,03,096 झाली आहे आणि 36375 अॅक्टिव्ह कोरोना व्हायरस रुग्ण आहेत. ही दिल्लीत अॅक्टिव्ह रुग्णांची आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शेतात सुकलेले पीक जाळल्याने दिल्लीची हवा अतिशय खराब स्थितीत पोहचली आहे. दिल्लीचा एक्यूआय 300 च्या पुढे गेला आहे. बुधवारी सकाळीसुद्धा दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता अतिशय खराब श्रेणीत नोंदली गेली. अशावेळी दिल्लीत लोकांना श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या दरम्यान सणाचा सीझन असल्याने बाजारात होणार्या गर्दीने कोरोनाचा धोका आणखी वाढवला आहे. चांदणी चौक असो, सरोजनी नगर असो की मार्केट, लोकांची मोठी संख्या येथे खरेदीसाठी पोहचत आहे, अशात कोरोनापासून वाचण्यासाठीचा दो गज की दूरीचा फॉर्म्युला निष्फळ ठरत आहे.