पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 217 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून शहरातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 5 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळं पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा 4 हजार 338 वर जावून पोहचला आहे. आज दिवसभरात 259 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 63 हजार 274 वर जावून पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 53 हजार 790 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 5 हजार 146 रूग्ण अॅक्टीव्ह आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 396 रूग्ण हे क्रिटिकल आहेत. त्यापैकी 260 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.