नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Corona Vaccine |संपूर्ण जगात व्हॅक्सीन देण्याचे काम वेगाने सुरू आहे. एक्सपर्ट व्हॅक्सीन घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर अनेक गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, रशियात लोकांना व्हॅक्सीन (Corona Vaccine) घेतल्यानंतर किमान तीन दिवसापर्यंत सेक्स न करण्याचा (Avoid Romance) सल्ला दिला जात आहे.
सेराटोव्ह प्रदेशाचे उप आरोग्यमंत्री डॉक्टर डेनिस ग्रेफर यांनी रशियाच्या लोकांना व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे जास्त शारीरीक श्रमाचे काम (Physical Activity) न करण्याचा सल्ला दिला आहे. या कामांमध्ये सेक्सचा (Avoid Sex) सुद्धा समावेश आहे. यापूर्वी येथील लोकांना व्हॅक्सीन घेतल्यानंतर दारू आणि सिगारेटपासून सुद्धा दूर राहण्याचा सल्ला दिला गेला आहे.
रशिया त्या देशांपैकी एक आहे जिथे व्हॅक्सीनेशनचा दर खुप कमी आहे. येथे आतापर्यंत केवळ 13 टक्के लोकांना व्हॅक्सीनचा डोस देण्यात आला आहे. एका पत्रकार परिषदेत डॉक्टर ग्रेफर यांनी म्हटले, प्रत्येकाला माहित आहे की सेक्स करण्यात भरपूर एनर्जी खर्च होते. यासाठी आम्ही लोकांना व्हॅक्सीन घेतल्यानंतर सेक्स सारख्या फिजिकल अॅक्टिव्हिटी (Physical Activity) पासून दूर राहण्याचा इशारा देत आहोत.
मात्र, ग्रेफर यांच्या या वक्तव्यावर येथील मीडियामध्ये खुप टिका सुद्धा होत आहे. तेथील सिनियर मेडिकल ऑफिशियल ओलेग कोस्टिन यांनी म्हटले की, ते ग्रेफर यांच्या वक्तव्याशी पूर्णसहमत नाहीत. व्हॅक्सीन घेतल्यानंतर पूर्णपणे सेक्स बंद करण्याऐवजी तुम्ही तो सावधगिरीने करू शकता. फक्त तो गरजेपेक्षा जास्त असू नये.
भारतात व्हॅक्सीनेशननंतर अशाप्रकारची कोणतीही गाईडलाईन अद्याप जारी केलेली नाही. मात्र,
युनिसेफकडून व्हॅक्सीन घेतल्यानंतर काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याबाबत सांगण्यात आले
आहे. युनिसेफचे सुद्धा म्हणणे आहे की, व्हॅक्सीन घेतल्याच्या 2-3 दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारची
जास्त फिजिकल अॅक्टिव्हिटी (Physical Activity) टाळली पाहिजे कारण या दरम्यान शरीर
व्हॅक्सीनच्या साईड इफेक्टमधून रिकव्हर होत असते.
web title : Corona Vaccine | How many days should not have sex after taking corona vaccine: Know the doctor’s advice.
Indian Railways | रेल्वे प्रवाशांना ‘या’ 44 गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार
Hingoli News । चालकाला ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आईसह 7 वर्षाचा मुलगा गेला वाहून