नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनबाबात आशा सतत वाढत चालली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय) ने ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेका वॅक्सीनला भारतात क्लिनिकल ट्रायलसाठी मंजूरी दिली आहे. सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया लवकरच येथे दुसर्या आणि तिसर्या फेजची ह्यूमन ट्रायल सुरू करेल. भारतात या वॅक्सीनचा डोस तयार करण्याचे काम सिरम इन्स्टीट्यूटने अगोदरच सुरू केले आहे. ऑक्सफर्डच्या वॅक्सीनकडे जगभराचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत अन्य देशांमध्ये या वॅक्सीनचा पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वी झाला आहे.
जगभरात होत आहेत क्लिनिकल ट्रायल
मागील महिन्यात ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोविड-19 वॅक्सीनची पहिली आणि दुसरी ह्यूमन ट्रायल यशस्वी ठरली होती. ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या ह्यूमन ट्रायलचे परिणाम चांगले आले आहेत. एप्रिलमध्ये याच्या पहिल्या फेजची ह्यूमन ट्रायल सुरू झाली होती. या दरमयान 1112 लोकांचे परिक्षण करण्यात आले होते. या वॅक्सीनच्या तिसर्या फेजची ट्रायल साऊथ अफ्रीका आणि ब्राझीलमध्ये करण्यात आली. आता भारतात तिसर्या फेजची ह्यूमन ट्रायल केली जाईल.
आतापर्यंत चांगले परिणाम
ट्रायलमध्ये सहभागी वॉलंटियर्समध्ये वॅक्सीनमुळे व्हायरसविरोधात प्रतिकारशक्ती विकसित झाली. याशिवाय ती खुप सुरक्षित असल्याचे दिसून आल्याचे म्हटले जात आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने दावा केला आहे की, ट्रायलमध्ये सहभागी लोकांमध्ये अँटीबॉडी आणि व्हाईट ब्लड सेल्स विकसित झाले. याच्या मदतीने मानवी शरीर संक्रमणाशी लढण्यासाठी तयार होऊ शकते. बहुतांश वॅक्सीन अँटीबॉडी बनवतात. तर, ऑक्सफर्डची वॅक्सीन अँटीबॉडीसह व्हाईट ब्लड सेल सुद्धा बनवत आहे.
भारताला होईल फायदा
ऑक्सफर्डच्या या प्रोजेक्टमध्ये सिरम इन्स्टीट्यूट पार्टनर फर्म आहे. येथे जगातील सर्वात जास्त वॅक्सीन बनवल्या जातात. सिरम इन्स्टीट्यूट इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांच्यानुसार जगाच्या 60-70 टक्के वॅक्सीनचे उत्पादन येथेच होते. सुमारे 1.5 बिलियन वॅक्सीनचे डोस येथे दरवर्षी तयार होतात. ऑक्सफर्डचा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया वॅक्सीनचे 100 कोटी डोस तयार करेल. यापैकी 50 टक्के भाग भारतासाठी असेल आणि 50 टक्के गरीब आणि मध्यम उत्पन्नाच्या देशांसाठी पाठवण्यात येईल.
23 वॅक्सीन रेसमध्ये
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सध्या जगभरात 140 वॅक्सीनवर काम सुरू आहे. यापैकी 23 वॅक्सीन अशा आहेत, ज्यांची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. एखादी वॅक्सीन तयार करण्यासाठी अनेक वर्ष लागतात, परंतु कोरोनासारख्या महामारीशी लढण्यासाठी जगभरातील संशोधक यावर युद्धपातळीवर काम करत आहेत. आशा आहे की, या वर्षअखेर वॅक्सीनचा शोध पूर्ण होईल.