मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत NDA प्रणित भाजपला भरगोस मतं मिळाली त्याचीच पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणूकित व्हावी म्हणून राजकीय हालचालींना सुरवात झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख यांनी विधानसभा निवडणूक कमळावर लढवणार नसल्याचे म्हंटले आहे.
आम्ही चे घटक पक्ष असलो तरी कमळ चिन्हावर आगामी विधानसभा लढण्यास तयार नाही. असे रासप अध्यक्ष आणि मंत्री महादेव जानकार यांनी स्पष्ट केले. नुकत्याच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने मुसंडी मारली आणि २०१४ ची पुनरावृत्ती करत पुन्हा एकदा केंद्रात भाजपचे सरकार स्थापण केले. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळेंना चांगलीच टक्कर दिली होती. त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक न लढवता ‘कपबशी’ चिन्हावर निवडणूक लढविली होती. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या चिन्हावरच लढणार असल्याचे, जाणकार म्हणाले.