बहुजननामा ऑनलाईन टीम : रात्रीतून सगळी सूत्र फिरली आणि सकाळी एक खळबळजनक घटना समोर आली, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांनीं शपथ घेतली. या नेत्यांचा शपथविधीचा राज्यातील जनतेबरोबर त्यांच्या पक्षातील नेत्यांसाठीदेखील धक्कादायक होता, याच पार्श्ववभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती.’
कॉंग्रेसचे सर्व आमदार एकत्र आहेत : मा. अहमद पटेल pic.twitter.com/xhnLIDTOgz
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 23, 2019
राज्यात जे राजकीय कांड झालं त्यासंदर्भात बोलण्यासाठी शब्द नाहीत. उशीर आमच्याकडून झालेला नाही, तर राष्ट्रवादीमधल्या काही लोकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, तसेच माहिती काँग्रेसचे वरीष्ठ नेते अहमद पटेल यांनी दिली.
Ahmed Patel, Congress: We will fight this on both fronts, political and legal. #Maharashtra https://t.co/77euYvgmTa pic.twitter.com/55mFDAPLh7
— ANI (@ANI) November 23, 2019
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज दुपारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्रित पत्रकार परिषद घेतली. तर काँग्रेसने स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेतली. विषयी बोलताना अहमद पटेल म्हणाले, “कालच आमची चर्चा चांगली झाली होती. सरकारस्थापनेची ही रात्रीत केलेली घाई पाहता भाजपने सकाळी घाईघाईने शपथविधी उरकला. हे सरकार कायद्याला धरून झालेलं नाही. आम्ही तिन्ही पक्ष मिळून फडणवीस सरकारचा पराभव करू.”
ज्याप्रकारे शपथविधी उरकला, ते पाहता काहीतरी काळंबेरं असल्याची मला खात्री आहे: मा. अहमद पटेल pic.twitter.com/CtS5PBjuu3
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 23, 2019
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेबरोबर सत्तास्थापनेला विरोध केला होता, त्यात आज भाजपने अजित पवारांच्या पाठिंब्याने शपथविधीसुद्धा उरकल्यानंतर निरुपम यांनी हे योग्यच असल्याची प्रतिक्रिया दिली.
Ahmed Patel,Congress: Today was a black spot in the history of Maharashtra. Everything was done in a hushed manner and early morning. Something is wrong somewhere. Nothing can be more shameful than this. pic.twitter.com/MHpahKkE2A
— ANI (@ANI) November 23, 2019
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात ‘महाविकासआघाडी’चे सरकार येणार,असा नवा दावा केला आहे. शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर तिन्ही पक्षात चर्चा सुरू आहे. कुठलेही संकट आले तरी आम्ही तिघे एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
Ahmed Patel,Congress: All the three(Congress-NCP-Shiv Sena) parties are together in this and I am confident we will defeat BJP in the trust vote. All Congress MLAs are present here except two who are right now in their village, but they too are with us. pic.twitter.com/s0snX0yQNm
— ANI (@ANI) November 23, 2019
Visit : bahujannama.com