बहुजननामा ऑनलाइन टीम – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणा-या रेणू शर्मा(lodged a complaint) या महिलेच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. रेणू शर्माच्या विरोधात भाजप आणि मनसे पदाधिकारी यांच्यानंतर आता मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनीही तक्रार दाखल केली आहे.
2019 पासून ती आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे केंद्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे. ब्लॅकमेल करणे, त्रास देणे अशा प्रकारचा त्रास रेणू शर्मा यांच्याकडून दिला जात होता, असे केंद्रे यांनी अपल्या तक्रारीत म्हटले आहे. पुरुषोत्तम केंद्रे यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात तक्रार नोव्हेंबरमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादीकडून मुंडेंना तूर्तास दिलासा
धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले असताना पक्षाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे. मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याचे समजते. रात्री उशिरा झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक रात्री उशिरा बोलावली होती. ही बैठक तीन तास चालली असून बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, राजेश टोपे, अनिल देशमुख, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी ही बैठक झाली.