नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Cobra Bites | चीनमधून समोर आलेल्या एका प्रकरणात एका कोब्राने शेफला आपल्या मृत्यूच्या 20 मिनिटानंतर दंश (Cobra Bites Chef 20 Minutes After Death) करून मारले. सापाचे कापलेले डोके डस्टबिनमध्ये फेकत असताना सापाने शेफला चावा घेतला.
ही विचित्र घटना चीन (China) मधून मधून समोर आली आहे. साऊथ चायनामध्ये कोब्रा सापाच्या स्किनपासून बनवलेले सूप मोठ्या चवीने प्यायले जाते. या धोकादायक सापाची स्किन हटवून त्याचे मांस शिजवून त्यापासून सूप बनवले जाते. परंतु, चीनच्या फोशन (Foshan) मध्ये राहणारा शेफ पेंग फॅन (Peng Fan) साठी कोब्रा सूप बनवणे जीवघेणे ठरले. कोब्रा सूप बनवताना त्याचा मृत्यू झाला तोसुद्धा मेलेल्या सापाने चावा घेतल्याने.
कापून ठेवले होते डोके
पेंगने आपल्या रेस्टॉरंटमध्ये कोब्रा सूप विक्रीसाठी ठेवले आहे. त्याच्या रेस्टॉरंटमध्ये येणार्या लोकांना हे सूप खुप आवडत होते. घटनेच्या दिवशी कोब्रा सूप बनवताना पेंगने साप कापून आपल्या किचनमध्ये ठेवला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पेंगने कोब्राची मान कापून वेगळी ठेवली होती आणि त्याच्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे केले. साप
कापल्यानंतर तो किचनची स्वच्छता करू लागला. याच दरम्यान पेंगने सापाचे कापलेले डोके
डस्टबिनमध्ये फेकण्यासाठी उचलताच, सापाने दंश केला. आपल्या मृत्यूच्या 20 मिनिटानंतर सुद्धा
साप जिवंत होता आणि त्याच्या विषाने पेंगचा मृत्यू झाला.
अर्ध्या तासात गेला जीव
कोब्राचे विष इतके भयंकर असते की, त्याच्या एका थेंबाने सुद्धा जीव जातो. कोब्राच्या विषात
न्यूरोटॉक्सिन्स असतात ज्याच्या एका थेंबाने अवघ्या 30 मिनिटात एखाद्याचा जीव जाऊ शकतो.
web title: Cobra bites chef killed after snake bites him 20 minutes after head chopped off for making cobra soup.
High Court | विवाहाशिवाय जन्मलेल्या मुलाच्या पित्याचे नाव सांगण्याची नाही आवश्यकता – हायकोर्ट