वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ANI वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलतानाचा असून चिडलेल्या आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्तीला शिवी दिल्याचा आरोप केला जात आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरल्याने योगींवर टीकाही होत आहे.
https://twitter.com/suryapsingh_IAS/status/1378912674470227974
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी (दि. 4) कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर ते ANI शी बोलत होते. प्रतिक्रिया देताना कॅमेरा हलल्याने योगी आदित्यनाथ चिडले आणि त्यांनी व्हिडीओ पत्रकाराला शिवी दिली. दरम्यान मुंबई युवक काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर केला असून हा आहे अजय बिश्त यांचा खरा चेहरा. एएनआयच्या पत्रकाराला कॅमेऱ्यासमोरच दिली शिवी. साधूच्या वेशात दिसणाऱ्या या तथाकथित योगींच्या डोक्यात भरलेली अमर्यादा, असंस्कृतता आणि खालच्या पातळीवरील शब्दाबद्दल भाजपाला भलेही अभिमान वाटेल, पण देश अपमानित झाल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तसेच सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱी सूर्य प्रताप सिंह यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत टीका केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा आहे खरा चेहरा. थोडा आवाज झाला म्हणून एएनआयच्या कॅमेरामॅनला शिवी देत आहे. असो एएनआयसोबत असच व्हायला हवे. देशातील सर्वात मोठी वृत्तसंस्था जेंव्हा सरकारी प्रवक्त्यांपेक्षाही जास्त पुढे पुढे केल्यावर असे होण साहजिकच आहे. संताची भाषा ऐका असे सूर्य प्रताप यांनी म्हटले आहे.
Video byte of UP CM Yogi Adityanath on Covid vaccination
(Editors note: Earlier issued Live Sound byte is retracted) pic.twitter.com/td9qQHSnrX
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 5, 2021
दरम्यान योगींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो डिलीट करून सुधारित व्हिडीओ पोस्ट केला गेला आहे. यापूर्वीचा प्रसिद्ध केलेल्या थेट प्रतिक्रियेचा व्हिडीओ मागे घेतला आहे. व्हिडीओत योगी आदित्यनाथ करोना लसीकरणासंदर्भात माहिती देत आहेत, असे ANI ने म्हटले आहे.
ये है अजय बिस्ट का असली चेहरा,
—एनएनआई के पत्रकार को कैमरे पर गाली;साधू के वेश में नज़र आते इन तथाकथित “योगी” के मस्तिष्क में पनपती इस अमर्यादा, अशालीनता एवं शाब्दिक निम्नता से बीजेपी बेशक गौरवान्वित महसूस करें पर राष्ट्र शर्मिंदा और शर्मसार हुआ है।
ये बीजेपी का असली चेहरा है। pic.twitter.com/tisg6AgONA
— Mumbai Youth Congress (@IYC_Mumbai) April 5, 2021