सांगली : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) एकाच फ्लेक्सवर झळकल्याने सध्या चर्चा सुरु आहे. एकदम ओके, पुरग्रस्त प्रोत्साहनपर 50 हजार अनुदान दिल्याबद्दल जाहीर आभार, अशा आशयाचे फलक सध्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात लागले आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राजू शेट्टी यांचे फोटो आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालूक्यातील रेठरे हरणाक्ष येथील एका शेतकऱ्याने पुरग्रस्तांना प्रोत्साहनपर अनुदान मिळाल्याने एक फलक लावले आहे. त्याची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नियमित कर्जधारकांना पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम जाहीर केली होती. त्यानंतर सरकार संकटात आले होते. त्यामुळे घाईत ही घोषणा केल्याने ही योजना बारगळली.
त्यानंतर राजू शेट्टी यांनी परिक्रमा पंचगंगेची यात्रा काढली. प्रयाग चिखली ते नृसिंहवाडी अशी दिडशे किलोमीटर अंतर पायी यात्रा काढून देखील सरकार वरमले नाही.
महाविकास आघाडी सरकारने 150 रुपये प्रतिगुंठा मदत शेतकऱ्यांना केली होती.
त्यानंतर कोल्हापूरात 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता.
या मोर्च्याची दखल घेत शिंदे सरकारने (CM Eknath Shinde) दिवाळीपूर्वी अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत. राजू शेट्टी यांच्या लढ्याला यश आले, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.
Web Title :- CM Eknath Shinde | chief minister eknath shinde and raju shetti appeared on the same banner in sangli
हे देखील वाचा :