मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – CM Eknath Shinde Ayodhya Tour | शिंदे गटाला शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे खासदार, आमदार आणि नेते आहेत. काही कार्यकर्ते रेल्वे तर काही विमानाने अयोध्येला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर (CM Eknath Shinde Ayodhya Tour) विरोधकांकडून टीका होत आहे. संजय राऊत (Sanjay Raut) आणि विरोधकांनी केलेल्या टीकेला रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याला (CM Eknath Shinde Ayodhya Tour) पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. यावर प्रत्युत्तर देताना रामदास कदम म्हणाले, अयोध्येला आम्ही का जाऊ नये, आम्ही श्रीरामाचं (Lord Shri Ram) दर्शन घेणं हा पब्लिसिटी स्टंट कसा काय? मुळात अयोध्येत जाऊन दर्शन घेणे पाप आहे का? अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) सत्ता असताना कमिशन खाऊन ज्यांनी पापं केली ती पापं धुण्यासाठी आम्ही अयोध्येला जात नाही. ती पापं धुण्यासाठी तुम्ही जायला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.
रामदास कदम पुढे म्हणाले, ते आमच्या दौऱ्याला पब्लिसिटी स्टंट (Publicity Stunt) म्हणत आहेत. अयोध्येत लावण्यात आलेल्या बॅनर्सवर ते बोलत आहेत. मात्र, ते बॅनर्स आम्ही लावले नाही. ते बॅनर्स तेथील लोकांनी लावले आहे. ही गोष्ट सगळ्यांच्या नशिबात नसते. राऊत साहेब तुमचं नशीब फुटकं आहे, अशा शब्दांत कदम यांनी संजय राऊतांवर घणाघात केला.
काश्मीर मधील कलम 370 हटवाव आणि अयोध्येत भव्य राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) बांधाव ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Late Balasaheb Thackeray) यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्ण केलं आहे. आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे. आता त्याठिकाणी राम मंदिर बांधलं जात आहे. त्यामुळे आम्ही प्रभू श्रीरांम यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी अयोध्येला जात असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : CM Eknath Shinde Ayodhya Tour | ramdas kadam attacks on sanjay raut over ayodhya rally comment
हे देखील वाचा :
Pune Crime News | लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार, विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात युवकावर गुन्हा