बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसनंतर प्रदूषण सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. हिवाळ्यात तर याचा स्तर खूपच जास्त असतो. प्रदूषणामुळे फुफ्फुसांवर जास्त (Cleanse Your Lungs)परिणाम होतो, यासाठी त्यांची स्वच्छता आवश्यक असते. फुफ्फुसांची स्वच्छता म्हणजे आपल्याला या हवामानात अशा वस्तूंचे सेवन केले पाहिजे, ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये प्रदुषणामुळे जाणारा विषारी गॅस नुकसान करणार नाही. फुफ्फुसांची कशी स्वच्छता राखायची जाणून घेऊयात…
1 आल्याचा चहा :
आल्यातील अँटी इनफ्लेमटरी तत्त्व रेस्पिरेटरी ट्रॅक्टने विषारी पदार्थांना बाहेर काढण्यास मदत करतात. आल्यात पोटॅशियम, मॅग्नीशियम, झिंक आणि बीटा कॅरोटीनसारखी औषधी तत्त्व असतात, जी कँसर सेल्सला मारण्यास सक्षम असतात.
2 दालचीनीचा काढा :
फुफ्फुसांच्या समस्येवर दालचीनीचा काढा उपयोगी आहे. एक ग्लास पाण्यात दालचीनी टाकून उकळवा आणि पाणी निम्मे झाल्यावर कोमट करून प्या. यामुळे फुफ्फुसांची स्वच्छता होऊ शकते.
3 वाफ घ्या :
वाफ घेतल्याने बंद नाक उघडते, फुफ्फुसांतील कफ बाहे काढते, सर्दी-तापात आराम देते.
4 प्राणायाम करा :
नियमित प्राणायाम केल्याने छातीतील कफापासून आराम मिळतो. फुफ्फुसांची स्वच्छता होते.
5 अक्रोडचे सेवन करा :
अक्रोडमधील ओमेगा-3 फॅटी अॅसिड फुफ्फुसांसाठी खूप लाभदायक असते. अस्थमाच्या रुग्णांसाठी हे उपयोगी आहे.
6 मासे सेवन करा :
मासे सेवन करणे फुफ्फुसासाठी लाभदायक ठरते. यामध्ये फॅट आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडची मात्रा जास्त असते.
7 बीन्सचे सेवन करा :
अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार हिवाळ्यात फुफ्फुसांच्या स्वच्छतेसाठी बीन्स लाभदायक आहेत.
8 सफरचंद :
सफरचंदमधील व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन आणि आंबट फळे फुफ्फुसांसाठी खूप उपयोगी आहेत. सफरचंद खूप उपयोगी आहे.
9 जर्दाळू
जर्दाळूत व्हिटॅमिन ए असते जे फुफ्फुसांसाठी लाभदायक आहे. यातील पोषकतत्त्व फुफ्फुसांतील इन्फेक्शनचा धोका कमी करतात.