नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बेचाळीस वर्षाच्या क्रिस गेलने आपल्या खेळातून पुन्हा एकदा जाणीव करून दिली की टी 20 चा बॉस तो होता, आहे आणि राहणार. ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध खेळलेल्या तिसर्या टी 20 मध्ये गेलने मैदानातून अशी हवाई फायरिंग केली की त्याने धावांचा पाऊसही पाडला आणि नवीन रेकॉर्डचा बादशाह सुद्धा बनला. त्याने टी20 मध्ये आपली 14000वी धाव ठोकली आणि असे करणारा जगातील एकमेव खेळाडू बनला. chris gayle becomes the first ever batsman to complete 14000 runs in t20 career the boss the universe boss
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गेल ने तिसर्या टी20 मध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना फटकारत 38 चेंडूंवर 67 धावा बनवल्या, ज्यामध्ये षटकार 7 आणि चौकार केवळ 4 होते. यामध्ये पाच षटकार तर केवळ सात चेंडूंच्या अंतराने मिळवले. पहिल्या दृष्टीक्षेपात हा आकडा गेलच्या खेळाशी मॅच करताना दिसत नसला तरी जेव्हा तुम्ही जाणून घ्याल की हा धडाकेबाज फलंदाज 67 धावांपर्यंत तेव्हा पोहचला जेव्हा त्याच्या 28 चेंडूंवर केवळ 32 धावाच होत्या, तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. या दरम्यान त्याने 33 चेंडूवर फिफ्टी पूर्ण केल्या.
गेलची ‘हवाई फायरिंग’ आणि 14000 धावा
गेलने सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाचा बेस्ट गोलंदाज जोश हेजलवुडच्या एका ओव्हरमध्ये 3 चौकार आणि एक षटकार ठोकला. तर स्पिनर एडम जम्पाच्या एका ओव्हरमध्ये लागोपाठ 3 षटकार मारले, हेच 3 षटकार मिळवत तो टी20 क्रिकेटमध्ये 14000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज बनला. तो तिसरा असा खेळाडू बनला ज्याने 40 वर्षाचे वय होऊन सुद्धा 1000 टी20 धावा पूर्ण केल्या आहेत.
त्याने टी20 इंटरनॅशनलमध्ये अर्धशतक काढून देखील विक्रम केला आहे. त्याने अखेरच्या वेळी टी20 मध्ये 50 प्लसचा स्कोअर एप्रिल 2016 मध्ये इंग्लंडच्या विरूद्ध केला होता. मात्र हे सुद्धा सत्य आहे की गेल मोठ्या कालावधीपासून केवळ जगभरातील टी20 लीगमध्ये भाग घेत होता आणि राष्ट्रीय टीमसाठी टी20 क्रिकेटपासून तो दूर झाला होता.
Web Title : chris gayle becomes the first ever batsman to complete 14000 runs in t20 career the boss the universe boss
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Rajasthan News | धक्कादायक ! सेल्फी काढताना अचानक वीज कोसळल्याने 11 जण जागीच ठार