नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेगाने वाढत असलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी बहुतांश देश वॅक्सीनसाठी दिवसरात्र काम करत आहेत. अनेक देशांनी वॅक्सीनची ह्यूमन ट्रायल सूरू केली आहे. भारतात सुद्धा कोरोना वॅक्सीनची ह्यूमन ट्रायल सुरू झाली आहे. पाटणा एम्समध्ये गुरूवारी 7 लोकांना कोरोना वॅक्सीनचा पहिला डोस दिला गेला. ट्रायलसाठी आतापर्यंत आठ लोकांना याचा डोस दिला गेला आहे. अजून कमीत कमी आणखी 50 लोकांवर याची ट्रायल होईल. दरम्यान, जगात सर्वप्रथम कोरोना वॅक्सीन बनवण्याच्या नादात चीनच्या एका कंपनीने परिक्षण म्हणून आपल्या कर्मचार्यांना कोविड-19 वॅक्सीन दिली. यासाठी कंपनीने कोणतीही परवानगी घेतलेली नाही.
भारतात तयार होत असलेली कोरोना वॅक्सीन फार्मास्यूटिकल कंपनी भारत बायोटेक तयार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जर सर्वकाही ठिक झाले तर लवकरच बाजारात कोवॅक्सीन येऊ शकते. वॅक्सीनच्या ट्रायलसाठी देशातील 12 संस्थांची निवड करण्यात आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमधील एक मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी कोरोनाच्या लढाईत भारतावर विश्वास व्यक्त केला आहे. बिल गेट्स म्हणाले, भारताच्या फार्मास्यूटिकल इंडस्ट्रीत इतका दम आहे की, ती संपूर्ण जगासाठी कोरोना वायरसविरोधी वॅक्सीन बनवू शकते.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात 140 पेक्षा जास्त वॅक्सीन तयार होत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या नुसार, अनेक वॅक्सीन आता फेज 2 ट्रायलच्या पुढे गेल्या आहेत. भारत बायोटेकची कोवॅक्सीन आणि भारतीय औषध कंपनी झायडस कॅडीलाची वॅक्सीन झायकोव्ह-डीची ह्यूमन ट्रायल सुरू होण्यासोबतच आक्सफर्ड युनिव्हर्सिटी, कॅनसिनो, एस्ट्रा-जेनेका, मॉडर्ना, सायनोफार्मसह अर्धा डझल वॅक्सीन अॅडव्हान्स फेजमध्ये आहेत.
जॉन्सन अँड जॉन्सनची ह्यूमन ट्रायल सप्टेंबरमध्ये
जॉन्सन अँड जॉन्सनने म्हटले की, ते सध्या कोरोना वॅक्सीनची ह्यूमन ट्रायल सुरू करणार नाहीत. ते ह्यूमन ट्रायल सर्वात शेवटच्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये सुरू करतील. कंपनीने पुढील आठवड्यापासनू फेज 1 ट्रायल सुरू करणार असल्याचे सांगितले. सुरूवातीस 1 हजार स्वयंसेवकांना वॅक्सीनचा डोस देण्यात येईल.
ऑक्सफोर्डची ह्यूमन ट्रायल यशस्वी
ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची कोविड-19 वॅक्सीनची पहिली ह्यूमन ट्रायल यशस्वी झाली आहे. ब्राझीलमध्ये करणयात आलेल ह्यूमन ट्रायलचे चांगले परिणाम आले आहेत. ट्रायलमध्ये सहभागी वॉलंटियर्समध्ये वॅक्सीनमुळे व्हायरसविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांना वॅक्सीन उहअवजु1 पउेत-19 (अनऊ1222) ची पूर्णपणे यशस्वी होण्याची अपेक्षा आहे. सोबतच त्यांना विश्वास आहे की, सप्टेंबर 2020 पर्यंत वॅक्सीन लोकांना उपलब्ध करून देण्यात येईल. या वॅक्सीनचे उत्पादन अॅस्ट्रा झेनेका करणार आहे. तर, भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सुद्धा या योजनेच सहभागी आहे.