बिजिंग : वृत्तसंस्था – जेव्हापासून कोरोना सुरू झाला, तेव्हापासून आजपर्यंत चीनने कधीही मान्य केलेले नाही की, कोरोनाची उत्पत्ती त्यांच्या येथून सुरू झाली, तसेच त्यांच्याकडे किती पॉझिटिव्ह प्रकरणे आहेत, आणि मृत्यूंचा खरा आकडा किती आहे. परंतु आता असे वाटत आहे की, सीसीपीचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने अप्रत्यक्षपणे हे स्वीकारले आहे की, अखेर चीनने कोरोनाने होणारे मृत्यू आणि पॉझिटिव्ह प्रकारणे जगापासून का लपवली. ग्लोबल टाइम्सच्या लेखातून हे स्पष्ट होते की, चीनने पश्चिमेतील देशांच्या कठोर प्रतिक्रिया येण्याच्या भितीने जगासमोर सत्य येऊच दिले नाही.
आपला एका संपादकियमध्ये अमेरिकेवर निशाणा साधताना ग्लोबल टाइम्सने अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंवर प्रश्न उपस्थित करत विचारले आहे की, चीनमध्ये 3,00,000 लोक कोरोनो व्हायरसने मेले असते आणि अमेरिका तसेच इतर पश्चिमी देशात जर ही महामारी नियंत्रणात असतील तर काय झाले असते?
याच प्रश्नाचे उत्तर सांगत या मीडिया पोर्टलने अप्रत्यक्षपणे हे स्वीकारले आहे की, चीनने अखेर आपला डेटा जगापासून का लपवला आहे. ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, जर ही धारणा सत्य असती तर चीनवर पश्चिमी देशांचा हल्ला झाला असता आणि पश्चिमी जनमतासाठी तो एक निशाणा बनला असता.
ग्लोबल टाइम्सने सांगितले की, अमेरिका तसेच अन्य देशांनी चीनची मदत तर केली असती परंतु तेव्हा कोरोना पसरणे आणि त्याच्यामुळे होणार्या मृत्यूंसाठी एक राजकीय कारण शोधले गेले असते. चीनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आरोग्य संकटाच्या राजकीय कारणांची आणि यास पसरण्यापासून चीनच्या असमर्थतेवर कठोरतेने चौकशी झाली असती. जर असे झाले असते तर प्रथम, त्यांनी या गोष्टीवर जोर दिला असता की, ही चीनची एक मोठी मानवी आपत्ती आहे, ती नैसर्गिक आपत्ती नाही, तर मानव निर्मित आपत्ती.
ग्लोबल टाइम्सने चेर्नोबिल अणू दुर्घटनेचे उदारहण देत सांगितले की, या दुर्घटनेला त्यावेळी पश्चिमी देशांद्वारे मानव निर्मित आपत्ती म्हणून लेबल करण्यात आले होते, आणि हे पश्चिमेसाठी सोव्हिएत संघावर हल्ला करण्याचे साधन झाले होते, जे सोव्हिएत संघाच्या पतनाचे एक कारण ठरले. जर कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये 3,00,000 लोक मेले असते, तर चीनवर पश्चिमी हल्ल्यांचा विचारही करता आला नसता.