छत्रपूर (मध्यप्रदेश) : वृत्तसंस्था – स्थानिक कॉंग्रेस नेत्याची सहा जणांनी गोळी झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना बडामलहरा शहरात घडली. प्रताप सिंह परमार (वय ४५) असे मृत कॉंग्रेस नेत्याचे नाव आहे. प्रताप सिंह परमार हे घुवारा गटाचे अध्यक्ष होते. या घटनेने संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला आणि रुग्णालयाच्या दरवाजाच्या काचा फोडल्या.
या घटनेने संतापलेल्या नातेवाईकांनी छत्रपूर जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयत तैनात केला होता. यावेळी पोलिस आणि नातेवाईक यांच्यात बाचाबाची झाली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
प्रताप सिंह परमार काल सायंकाळी आयुष हॉटेलजवळ थांबले होते. तेव्हाच हेल्मेटधारी दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या छाती लागल्या. या हल्ला करुन ते पळून गेले. परिसरातील नागरिकांनी परमार यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले, परंतु त्यांना मृत घोषित केले.