बहुजननामा ऑनलाईन – मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी राज्याचे प्रभारी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचं वृत्त विविध वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे.
सरकारचा मोठा निर्णय
श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी
श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 17, 2021
जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही माहिती सुत्रांकडून देण्यात आली असल्याचं वृत्त वाहिन्या दाखवत आहेत. मात्र, यासंदर्भात अद्याप ठाकरे सरकारकडून काही एक अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.
दरम्यान, राज्याच्या पोलिस महासंचालकांचा पदभार रजनीश शेठ यांच्याकडे देण्यात आला असून परमबीर सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाचा पदभार दिल्याचं वृत्त विविध चॅनलवरून देण्यात आलं आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या प्रकरणामुळं महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आल्याचे दिसत आहे. भाजपकडून दररोज सरकारवर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. आज राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.