नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसापासून राणी एलिझाबेथ विरुद्ध मेगन मार्कल यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. ऑपरा विन्फ्रेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मेगन मार्कल आणि तिचा पती हॅरी यांनी ब्रिटीश राजघराण्यावर वर्णद्वेषाचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर राजघराण्याला बाळाचा रंग काय असेल याची चिंता होती असा आरोपही मेगननं केला आहे. या नंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली होती. मतमतांतरे सुरु असतानाच फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ या साप्ताहिकाने याच विषयावर आधारित प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या संदर्भात अनेकानी हे व्यंगचित्र म्हणजे आगीत तेल ओतण्याचा प्रकार असल्याचं म्हंटल आहे. ‘शार्ली हेब्दो’ने हे व्यंगचित्र कव्हर पेजवर प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) या मेगनच्या मानेवर गुडघा ठेऊन उभ्या असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
#CharlieHebdo, this is wrong on every level. The Queen as #GeorgeFloyd's murderer crushing Meghan's neck? #Meghan saying she's unable to breathe? This doesnt push boundaries, make anyone laugh or challenge #racism. It demeans the issues & causes offence, across the board. pic.twitter.com/ptNXs8RtuS
— Dr Halima Begum (@Halima_Begum) March 13, 2021
मागील वर्षी जून महिन्यामध्ये अमेरिकेच्या मिनिसोटा राज्यातील जॉर्ज फ्लॉईड या निशस्त्र तरुणाच्या मानेवर चार पोलिसांनी ९ मिनिटे पाय दाबून ठेवून त्याची हत्या केली. हा प्रकार भर रस्त्यावर घडला होता या घटनेमुळे मोठे आंदोलन झाले होते. वर्णद्वेषाच्या विरोधात अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडू यांनी गुडघ्यावर बसून निषेध केला होता. याच घटनेचा संदर्भ वापरुन ‘शार्ली हेब्दो’ने हे चित्र रेखाटलं आहे. यामध्ये जॉर्जच्या जागी मेगन ही अन्याय सहन करणारी व्यक्ती म्हणून दाखवली आहे.
If you had any doubt how pervasive racism is, look at this French Charlie Hebdo magazine equating Meghan Markle with a violent felon simply because of her race. pic.twitter.com/zWQ17hU891
— Michael Malice (@michaelmalice) March 13, 2021
मेगनने बर्किंगहॅम का सोडलं ? या मथळ्याखाली हे व्यंगचित्र छापण्यात आलं आहे. राणीने मानेवर पाय दिलेल्या अवस्थेत मेगन, “कारण मला तिथे गुदमरल्यासारखं होत होतं,” असं उत्तर देताना व्यंगचित्रात दिसत आहे.
A cartoon of the queen kneeling on Meghan’s neck whilst she cries ‘I can’t breathe.’
Every time they produce one of these covers and Black people complain, we’re patronised and told that we don’t understand French satire. Why does this racist magazine Charlie Hebdo still exist? pic.twitter.com/MzNyjHNiw4— BlackWomansHour (@hour_womans) March 13, 2021
राणीने दिलेलं उत्तर…
दरम्यान, राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी मेगन आणि हॅरीने मुलाखतीमध्ये केलेले सर्व आरोपांना उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्याबाबत सहानुभूती व्यक्त केली आहे. हॅरी आणि मेगन यांच्यासाठी गेली काही वर्ष कितपत आव्हानात्मक होती हे समोर आल्यानंतर त्यांच्यासंबंधी कुटुंबाला चिंता सतावत आहे. अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले त्यापैकी रंगाचा मुद्दा चिंता निर्माण करणारा आहे. मतमतांतर असू शकते पण हे सर्व गांभीर्याने घेण्यात आलं असून खासगीत यासंबंधी कुटुंब चर्चा करेल,” असं एलिझाबेथ यांनी सांगितलं आहे. तसेच यावेळी त्यांनी कुटूंबात हॅरी, मेगन आणि आर्ची हे नेहमीच प्रिय सदस्य असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.