बहुजननामा ऑनलाइन टीम – भारतीय अंतराळ संस्था इस्रोने सांगितले की, भारताच्या दुसर्या चंद्र अभियानाच्या चंद्रयान-2 ने गुरुवारी चंद्राच्या कक्षेच्या चारही बाजूंनी परिक्रमा करत एक वर्ष पूर्ण केले असून सध्या त्याची सर्व उपकरणे चांगली काम करीत आहेत.
तसेच चंद्रयान-2 मध्ये आणखी सात वर्षांच्या ऑपरेशनसाठी पुरेसे इंधन आहे, असे देखील म्हटले आहे. चंद्रयान-2 चे प्रक्षेपण 22 जुलै 2019 रोजी केले होते आणि एक वर्षांपूर्वी 20 ऑगस्ट रोजी याने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने म्हटले आहे की, ‘तथापि, (रोव्हर घेऊन जाणाऱ्या लँडरचा) लँडिंगचा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. त्याच वेळी, आठ वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज अंतराळ यानने चंद्राच्या कक्षेमध्ये यशस्वीरित्या प्रवेश केला होता. या अवकाशयानानं चंद्राच्या कक्षामध्ये सुमारे 4,400 परिक्रमा पूर्ण केल्या आहेत आणि त्याची सर्व साधने चांगली काम करत आहेत.’ इस्रोने एका निवेदनात म्हटले आहे की अंतराळ यान अगदी ठीक आहे आणि त्याच्या उपप्रणालीची कामगिरी सामान्य आहे.