सांगोला/सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या भाजपच्या (BJP) घरवापसीच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. एकनाथ खडसे यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश होणे हा काही सोपा विषय नाही, असं सांगत त्यांची घरवापसी कठीण असल्याचे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केलं. पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकनाथ खडसे यांच्या घरवापसीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ते सांगोला दौऱ्यावर आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, नाथाभाऊंचे जाणे दु:खद होते. एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. पण एकनाथ खडसे यांचा पुन्हा भाजप प्रवेश होणे , हा काही सोपा विषय नाही. नाथाभाऊंचा पक्ष सोडण्याच्या कारणावर आधी चर्चा होईल, मगच निर्णय होऊ शकतो, असे पाटील यांनी सांगितले.
सरकार येईल हा अजित पवारांचा (Ajit Pawar) आशावाद चांगला तो ठेवावाच लागतो. ठाकरे, राष्ट्रवादीला अस्तित्व ठेवण्यासाठी एकत्र यावे लागेल. शिवसेनेच्या (Shivsena) पाठीशी अदृश्य हात कुणाचे हे रोहित पवारांनीच (Rohit Pawar) सांगितले आहे. देशाला तोडण्यासाठी ज्या शक्ती हातात हात घालून काम करतात हे नक्षलवाद्यांच्या (Naxalists) समर्थनावरुन स्पष्ट झाले. 5 हजार वर्षे झाले हिंदुत्व संपवण्याचा डाव सुरु होता, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
दरम्यान, गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे हे नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांना भेटले होते. त्यावेळी एकदा भेटूया, सगळं मिटवून टाकू,
असा खुलासा महाजन यांनी केला होता. मात्र, मी अशी कोणतीही मागणी फडणवीस यांच्याकडे केली नव्हती,
असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Chandrakant Patil | will eknath khadse join bjp again chandrakant patil denied
हे देखील वाचा :
Dasara Melava 2022 | उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाईल, पण…, नारायण राणे यांचे मोठं विधान