मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेचे (Shivsena) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांची न्यायालयीन कोठडीतून जामीनावर सुटका झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटात (Thackeray Group) आनंदाचे वातावरण आहे. त्यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांना जामीन मिळाला, हे ऐकून खूप आनंद झाला. संजय राऊत कुणाच्याही दबावापुढे झुकले नाहीत. हा त्यांच्या लेखणीचा विजय आहे, असे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संजय राऊतांना अखेर 100 दिवसांनी जामीन मिळाला आहे. ही आमच्यासाठी आणि शिवसैनिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. यासाठी मी न्यायपालिकेचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद देतो. संजय राऊत हे शिवसेनेचे एकनिष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर विरोधकांनी दबाव आणला. पण ते डगमगले नाहीत. हा त्यांच्या लेखणीचा विजय आहे. मी मरुन जाईन, पण शिवसेना सोडणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) कडवट शिवसैनिक (Shiv Sainik) आहे. मी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली काम करणारा नेता आहे. असे संजय राऊत कित्येकदा म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे राऊत कणखर राहिले आणि आज अखेर सत्याचा विजय झाला आणि ते सुटले आहेत, असे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले.
तसेच बाकीचे गद्दार आहेत. त्यांनी संजय राऊत यांचे उदाहरण घेतले पाहिजे. ईडी आणि तपास यंत्रणांच्या दबावापुढे हे सगळे उघडे पडले आहेत. पण आज सत्याचा विजय झाला. मी संजय राऊत यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे देखील यावेळी खैरे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी देखील संजय राऊत यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसैनिकांना आर्थर रोड तुरुंगाबाहेर संजय राऊतांच्या स्वागताला मोठी गर्दी केली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
आमचा सेनापती आज मुक्त झाला, असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Chandrakant Khaire | shivsena leader chandrakant khaire on sanjay raut granted bail
हे देखील वाचा :
T20 World Cup | रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही? दिली ‘हि’ मोठी अपडेट
T20 world cup 2022 | फायनलमध्ये पाकिस्तानची धडक, न्यूझीलंडवर मिळवला मोठा विजय
T20 World Cup | सेमी फायनलपूर्वी इंग्लंडला दुसरा धक्का ! ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला जखमी
Sanjay Raut | संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यावर थेट घरी जाणार नाहीत, तर…