सिडनी : वृत्तसंस्था – T20 world cup 2022 | आयसीसी (ICC) स्पर्धेच्या मैदानात पाकिस्ताननं (Pakistan) न्यूझीलंडवर (New Zealand) पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं. आज सिडनीच्या (Sydney) मैदानात सेमी फायनलमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह पाकिस्तानने तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपच्या (T20 world cup 2022) फायनलमध्ये प्रवेश केला. याआधी 2007 आणि 2009 मध्ये पाकिस्ताचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजच्या सामन्यात न्यूझीलंड संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 4 बाद 152 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून डॅरी मिचेलने (Darry Mitchell) सर्वाधिक नाबाद 53 धावा केल्या तर कर्णधार केन विल्यमसन्सने (Ken Williamson) 46 धावांची खेळी केली. बाकी खेळाडूंनी म्हणावी तशी कामगिरी केली नाही. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 world cup 2022) बाबर (Babar Azam) आणि रिझवान (Mohammad Rizwan) ही भरवशाची जोडी फ्लॉप ठरली होती. पण सेमी फायनलच्या निर्णायक मुकाबल्यात हे दोघंही पुन्हा फॉर्मात आले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 105 भागीदारी साकारत पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचला.
WHAT A WIN, PAKISTAN! 🤯
Pakistan have reached their third Men's #T20WorldCup final 👏#NZvPAK pic.twitter.com/dumaIcWVeZ
— ICC (@ICC) November 9, 2022
भारत पाकिस्तान फायनल?
दरम्यान मेलबर्नमध्ये 13 नोव्हेंबरला यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना होणार आहे.
पहिल्या सेमी फायनलमध्ये पाकिस्ताननं न्यूझीलंडला हरवून फायनलमध्ये धडक मारली आहे.
त्यामुळे आता भारतानं इंग्लंडला हरवून फायनल गाठावी अशी क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे.
असं झालं तर मेलबर्नमध्ये पुन्हा एकदा महामुकाबला पाहण्याची प्रेक्षकांना संधी मिळणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- T20 world cup 2022 | pakistan beat new zealand in t20 wc semi final reached into the final
हे देखील वाचा :
T20 World Cup | सेमी फायनलपूर्वी इंग्लंडला दुसरा धक्का ! ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला जखमी
Sanjay Raut | संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यावर थेट घरी जाणार नाहीत, तर…
Sanjay Raut | संजय राऊत यांना केलेली अटक बेकायदेशीर – विशेष सत्र न्यायालयाने ईडीला फटकारले