बहुजननामा ऑनलाईन टीम – काही दिवसांपूर्वीच दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर (Mohanbhai Delkar) यांच्या आत्महत्येची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यानंतर आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
‘मोहन डेलकरांनी आत्महत्येपूर्वी मोदी व शाह यांना दोन वेळा पत्र लिहिलं होतं’
सचिन सावंत म्हणाले, खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांबाबत माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना दोन वेळा पत्र लिहिलं होतं. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असा गौप्यस्फोट सावंत यांनी केला आहे.
‘डेलकर यांनी मोदींकडे भेटीची वेळदेखील मागितली होती’
पुढं बोलताना सचिन सावंत म्हणाले, डेलकर यांनी पत्रं लिहिली होती, त्यात त्यांनी आपली आर्त याचना, त्यांच्यावर होणारे अत्याचार, ज्यांना जे वारंवार केंद्रीय अधिकारी व भाजप नेत्यांकडून अपमानित केलं जात आहे, या संदर्भातील पूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली होती. त्याचबरोबर त्यांनी भेटीची वेळदेखील मागितली होती. त्यांना स्वत: भेटून आपली आर्त कहानी सांगायची होती; परंतु त्यांना भेटदेखील दिली नाही, असा आरोपही सावंत यांनी केला.
‘पत्र मिळूनदेखील त्यांनी का मदत केली नाही ?’
सचिन सावंत असंही म्हणाले, जर आम्ही आमच्या खासदाराला वाचवू शकलो, नाही तर आम्हाला आमच्या लोकशाहीचा अभिमान वाटावा का? खासदार मोहन डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष या सर्वांचा दरवाजा ठोठावला होता. पंतप्रधान मोदींना 18 डिसेंबर 2020 आणि 31 जानेवारी 2021 या दिवशी पत्र मिळूनदेखील त्यांनी का मदत केली नाही ? असा सवालही त्यांनी केला आहे.
Can we feel proud of our Democracy if we can't save our parliamentarian? MP #MohanDelkar knocked each door including our Prime Minister, HM & Loksabha speaker. Why did Modi ji not help when he received two letters one on 18 Dec 2020 & other on 31st Jan 2021? pic.twitter.com/xthqWssS1A
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 13, 2021
मोहनभाई म्हणाले – ‘त्यांच्यासमोर राजीनामा देणं किंवा आत्महत्या करणं हे 2…’
सावंत म्हणाले, 12 फेब्रुवारी 2021 रोजी मोहनभाईंनी त्यांना त्रास दिला जात होता म्हणून लोकसभेच्या विशेष अधिकार समितीसमोरदेखील मदतीसाठी याचना केली होती, असंदेखील कानावर आलं आहे की, मोहनभाई म्हणाले होते की, त्यांच्यासमोर राजीनामा देणं किंवा आत्महत्या करणं हे दोन पर्याय उरलेले आहेत. लोकसभेने याबाबत स्पष्टीकरण द्यावं, अशी आम्ही मागणी करतो.
On 12 th Feb 2021 Mohanbhai begged before " Loksabha Committee of Privileges" for help as he was being harassed. It is being heard that Mohanbhai even said that he has two options before him either to resign or committing suicide. We demand confirmation of the same from loksabha
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 13, 2021
‘दादरा येथे आत्महत्येच्या अन्यदेखील घटना घडल्या, त्या सर्वांचा संबंध दिसतो’
सावंत म्हणतात, तथाकथित 56 इंच छाती असलेले सरकार आमच्या असहाय खासदाराला वाचवू शकले नाही. कारण मोदी सरकारच त्यांना वाचवू इच्छित नव्हते. त्यांचा छळ करणाऱ्या सर्वांची नावं पंतप्रधान व गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आली होती. दादरा येथे आत्महत्येच्या अन्यदेखील घटना घडल्या आहेत, त्या सर्वांचा एकमेकांशी संबंध दिसतो असंही ते म्हणाले.