मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – प्रसिद्ध ‘कॅफे काॅफी डे’ चे मालक वीजी सिद्धार्थ अचानक गायब झाले आहेत. कर्नाटकातील मंगळुरु येथील नेत्रावती नदी जवळील भागातून गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एसएम कृष्णा यांचे जावई आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी युद्धपातळीवर तपासाला सरुवात केली आहे.
Karnataka: VG Siddhartha, son-in-law of former CM SM Krishna and the founder-owner of the chain of Cafe Coffee Day, has gone missing near Netravati River in Mangaluru. Searches underway.
— ANI (@ANI) July 30, 2019
सूत्रांच्या माहितीनुसार, वीजी सिद्धार्थ हे शेवट आपल्या CFO कंपनीशी ५६ सेकंद बोलले. तेव्हा त्यांनी आपल्या कंपनीकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्यावेळी ते आपल्या CFO सोबत फोनवर बोलत होते, त्यावेळी ते खूप नाराज होते. CFO सोबत बोलल्यानंतर त्यांनी आपला मोबाइल स्विच ऑफ केला.
वीजी सिद्धार्थ हे काल पासून गायब आहेत. ते काही कामानिमीत्त नेत्रावती नदीच्या पुलावर गाडी थांबवून उतरले होते. ड्रायव्हरला थोड्या वेळात येतो असे सांगून वाट पाहायला सांगितले. मात्र बराच वेळ झाला तरिही सिद्धार्थ परतले नाहीत. त्यानंतर ड्रायव्हरने त्यांना फोन केला मात्र फोन स्विच ऑफ येत होता. त्यानंतर ड्रायव्हरने या घटनेची माहिती नातेवाईक आणि पोलीसांना दिली. सिद्धार्थ यांचा सर्व स्तरावर तपास सुरु आहे. त्यांच्या अचानक गायब होण्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.