बहुजननामा ऑनलाईन – देशातील काही राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होत आहे. तर पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ हे राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेश अशा ५ राज्यांचा निवडणुकीचा निकाल २ मे मध्ये जाहीर केला जाणार असून, मात्र निकालापूर्वी विधानसभा निवडणुकांबाबत ‘सी व्होटर्स’ने निकालाचा सर्वेक्षण (Opinion poll) केलं आहे. निवडणुकीपूर्वी मतदारांचा कौल कुणाकडे आहे? हे सी व्होटरच्या सर्व्हेवरून समोर आलं आहे.
तर या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार पश्चिम बंगाल राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) चे सरकार येऊ शकते. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांना फटका बसणार असल्याचं सर्वेक्षणानुसार कळते. तसेच भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालची सत्ता मिळविण्यासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे. तर येथे भाजपच्या जागाही वाढत असल्याचे दिसत आहे. तसेच, पश्चिम बंगाल – एकूण जागा – २९२, टीएमसी – १५२ ते १६८ जागा, तर भाजप – १०४ ते १२० जागा, काँग्रेस+लेफ्ट – १८ ते २६ जागा, आणि इतर – ०ते २ जागा. अशा पक्षानुसार जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
तामिळनाडू राज्यात विधानसभेच्या एकूण २३४ जागांसाठी निवडणूक होत आहे. यांपैकी युपीएला १७३ ते १८१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यूपीएच्या ७९ जागा वाढण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) २०१६ च्या तुलनेत ८७ जागांवर फटका बसण्याचा अंदाज आहे. येथे यावेळी एनडीएला फक्त ४५ ते ५३ जागाच मिळण्याचा अंदाज आहे. तसेच २०१६ रोजी हा आकडा १३६ एवढा होता. तर तमिळनाडू एकूण जागा – २३४, यूपीए (डीएमके+काँग्रेस+इतर) – १७३ ते १८१, एनडीए (एआईएडीएमके+भाजप+इतर) – ४५ ते ५३, एमएनएम – १ ते ५, एएमएमके – १ ते ५, इतर – ० ते ४.
केरळ राज्यात पुन्हा एकदा एलडीएफचे सरकार सत्ता बनताना दिसत आहे. तर केरळ एकूण जागा – १४०, एलडीएफ – ७१ ते ८३ जागा, यूडीएफ – ५६ ते ६८ जागा, भाजप – ० ते २ जागा, इतर – ० जागा. तसेच आसाममध्ये पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येऊ शकते. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ६३ आहे. आसाम एकूण जागा – १२६, एनडीए – ६५ ते ७३ जागा, यूपीए – ५२ ते ६० जागा, इतर – ० ते ४ जागा. पुदुच्चेरीत एनडीएला ३० पैकी १९ ते २३ जागा मिळू शकतात. तर यूपीएला (काँग्रेस आणि डीएमके) ७ ते ९ जागा मिळू शकतात. तर पुदुच्चेरीत ६ एप्रिलला मतदान होणार आहे.